Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदत करत सातारचा शाही दसरा सोहळा शांततेत

सातारा : जल मंदिर येथे श्री भवानी तलवारीचे पूजन करताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर भवानी तलवारीचे पूजन करताना खा. श

विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलनाची वेळ : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
मोदी सरकारकडून जनतेची पिळवणूक : आ. पृथ्वीराज चव्हाण
महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

सातारा / प्रतिनिधी : येथील खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पूरग्रस्तांना मदत करा आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत दरवर्षीप्रमाणे होणारा दसर्‍याचा शाही सिमोल्लंघन सोहळा तसेच दसर्‍याचा सोने लुटण्याचा कार्यक्रम अतिशय शांत स्वरूपात झाला. राजघराण्याच्या वतीने जलमंदिर येथे छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जल मंदिरात गर्भगृहात श्री भवानी तलवारीचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन केले वेदमूर्ती उपेंद्र शास्त्री धांदरफळे व वेदमूर्ती नांदेडकर यांनी या पूजा सोहळ्याचे पौरोहित्य केले. त्यानंतर सुशोभित केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर भवानी तलवार ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या मावळ्यांच्या सोबत आणि सिंग तुतार्‍यांच्या निनादात सनई चौघडेच्या मंगल सुरात मिरवणूक काढण्यात आली.
जल मंदिरापासून ही मिरवणूक पोवई नाका येथे शिवतीर्थ परिसरात पोहोचल्यावर सायंकाळी या भवानी तलवारीचे पूजन छत्रपती घराण्याचा वतीने उदयनराजे भोसले यांनी केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जल मंदिर येथे सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही आपल्या सुरू बंगल्यात सायंकाळी मान्यवरांना सोने देऊन हा विजया दशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सातारा शहरातून संघाचे वतीने दोन संचलने झाली. पहिले संचलन सकाळी सातारा शहरातून न्यू इंग्लिश स्कूल येथून विविध पेठांमधून पुन्हा न्यू इंग्लिश स्कूल येथे परत आले. दुसरे संचलन सायंकाळी अर्कशाळा मैदान ते शाहूपुरी गेंडामाळ परिसरातून झाले. यावेळी मार्गावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पुष्पवृष्टी केली. यावेळी रस्त्यावर काढलेल्या भव्य रांगोळ्या तसेच स्फूर्ती पदे, घोषवाक्य ही या संचालनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचा उत्साह वाढवणारी होती.

COMMENTS