HomeUncategorized

फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल

फलटण /प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीसांनी मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खटकेवस्ती ता. फलटण येथील गणेश नारायण खटके यांच्या

गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक पकडण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आजचा मुक्काम कोठे?
चार गावच्या टाक्यांसह 72 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

फलटण /प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीसांनी मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खटकेवस्ती ता. फलटण येथील गणेश नारायण खटके यांच्या शेताजवळील आंब्याखाली सुरू असलेल्या तीन पानी जुगाराच्या डावावर झापा टाकून 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 77 हजार 280 रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खटकेवस्ती ता. फलटण येथील गणेश नारायण खटके यांच्या शेताजवळील आंब्याखाली सुरू असलेल्या तीन पानी जुगाराच्या डावावर झापा टाकून 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 77 हजार 280 रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या छाप्यात पाया शंकर निंबाळकर डोर्लेवाडी, महादेव रामभाऊ खटके खटकेवस्ती, गणेश नारायण खटके खटकेवस्ती, नितीन बापुराव कदम गवळीनगर, अशोक वामन घाडगे घाडगेमळा, सुनील खटके, रामभाऊ वाघमोडे, गोरख पवार, लखन शेख, अजित गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीसात दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक अरगडे अधिक तपास करत आहेत.

COMMENTS