Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : आत्मदहन करणार्‍या युवकाला पोलीस कर्मचारी घेवून जाताना (छाया : संजय कारंडे) सातारा / प्रतिनिधी : शेरेवाडी ता. सातारा येथील सचिन स्वामी या

पालखी सोहळा 28 जून ते 4 जुलै सातारा जिल्ह्यात येणार
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध
दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकावर कारवाई

सातारा / प्रतिनिधी : शेरेवाडी ता. सातारा येथील सचिन स्वामी या युवकाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच माने कुटुबियांच्या अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडल्याने पुढील अनर्थ टळला. आत्मदहनाबाबत यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते.
यामध्ये त्यांनी शेरेवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबियांकडून अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. मागील 15 दिवसांपुर्वी त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना आत्मदहनाबाबत निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मिळकत नंबर 163 मधील गुरांच्या गोठ्याची डागडुजी चालू असताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनंत गवाणे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबियांनी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत दमदाटी करून शेडचे दुरुस्ती काम बंद पाडत शेडच्या 6 पोलचे नुकसान केले होते. यावेळी संबंधितांविरुध्द कारवाई झाली नव्हती. संबंधितांकडून वारंवार होणार्‍या अन्यायाला कंटाळून स्वामी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

COMMENTS