Homeताज्या बातम्याअहमदनगर

‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ पुस्तकाचे प्रकाशन

शिर्डी : क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंची मानसिकता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा अभ्यास मांडणार्‍या ‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्

संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
महात्मा बसवेश्वर जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
’क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्तकाचे प्रकाशन शिर्डी



शिर्डी : क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंची मानसिकता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा अभ्यास मांडणार्‍या ‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उत्साहात पार पडले. ज्येष्ठ लेखक, क्रिकेट विश्‍लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता विघावे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी डोंगरे, विठ्ठलराव सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकामध्ये क्रिकेट विश्‍वातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाचा सखोल वेध घेण्यात आला आहे. खेळाडूंची मैदानावरील एकाग्रता, मानसिक अस्वस्थता, तसेच मानसिकतेचा खेळावर होणारा परिणाम यांचा संशोधनात्मक अभ्यास लेखकाने मांडला आहे. विशेषतः ‘मानसिक अस्वस्थता’ आणि ‘अंधश्रद्धा’ या विषयांवर पुस्तकात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. डॉ. दत्ता विघावे यांचे आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लेख विविध प्रसारमाध्यमांत प्रकाशित झाले आहेत. क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कविता आणि कथासंग्रहांनाही वाचकांचा प्रतिसाद मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांसारख्या देशांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला आहे.

COMMENTS