Homeताज्या बातम्या

वटपौर्णिमेनिमित्त गोळेगावात १११ वटवृक्षांचे वृक्षारोपणगटविकास अधिकारी सोनल शहा, महंत बाबागिरी महाराजांच्या हस्ते प्रारंभ  

शेवगाव : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘झाड’ फाउंडेशनच्या वतीने गोळेगाव येथील धनगरवस्तीवरील हनुमान मंदिर परिसरात १११ वटवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे
खा. वाकचौरे यांचा कोपरगावात निषेध
यश फाउंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात


शेवगाव : वटपौर्णिमेचे औचित्य साधून ‘झाड’ फाउंडेशनच्या वतीने गोळेगाव येथील धनगरवस्तीवरील हनुमान मंदिर परिसरात १११ वटवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ श्री क्षेत्र काशीकेदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज तसेच शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या हस्ते झाला.
झाड फाउंडेशन गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहे. यावर्षी शुभमुहूर्तावर १११ वटवृक्षांची लागवड करण्यात आली असून, या सर्व वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही फाउंडेशनने स्वीकारली आहे.
यावेळी महंत बाबागिरी महाराज म्हणाले, “ही सृष्टी जर सुंदर मूर्ती असेल, तर वृक्षवल्ली हे तिचे अलंकार आहेत. आज वृक्षतोडीमुळे निसर्गाचे सौंदर्य विद्रूप होत असताना झाड फाउंडेशनचे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व अध्यात्मिक स्वरूपाचे आहे.”
 गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून सर्व सजीवांचे संरक्षण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य केवळ वृक्षच करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे.”
‘झाड’ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार-पाच वर्षांपासून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. धार्मिक सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, स्मृती वृक्ष, ‘गावच्या लेकीचे झाड’, ‘गावच्या सुनेचे झाड’ अशा विविध संकल्पनांतून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यास गोळेगाव व परिसरात आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार फाउंडेशनने व्यक्त केला.

COMMENTS