Homeताज्या बातम्या

विना नंबर प्लेट वाहनांवर श्रीगोंदा पोलिसांचा बडगा१३ दिवसांत ६४० वाहनांवर कारवाई, आठ लाखांचा दंड

श्रीगोंदा : चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा पोलिसांनी राबविलेल्या विशेष

पावसाअभावी शेतकरी झाला हवादिलहिरव्या चाऱ्याची टंचाई; दूध उत्पादकांसमोर पशुपालनाचे मोठे संकट
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयास ‘अ’ दर्जा
ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  

श्रीगोंदा : चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत गेल्या १३ दिवसांत विना नंबर प्लेट व आवश्यक कागदपत्रांशिवाय आढळलेल्या तब्बल ६४० वाहनांवर कारवाई करत ८ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोमवारी (दि.२९) एकाच दिवशी ५६ वाहनांवर कारवाई करून ५६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
गोपनीय बातमीदारामार्फत काही आरोपी चोरीच्या दुचाकींवरील नंबर प्लेट काढून त्यांचा वापर करत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १७ जून ते २९ जून २०२६ या कालावधीत शहरासह पोलीस स्टेशन हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान विना नंबर प्लेट आढळलेल्या सर्व वाहनांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या आरसी बुकची पडताळणी, चेसिस नंबर व इंजिन नंबरची तपासणी तसेच वाहन मालकीची खातरजमा करण्यात आली. नियमांचे पालन करून जागेवर नंबर प्लेट बसविणाऱ्या व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या ६२८ वाहनांना दंडात्मक कारवाईनंतर सोडण्यात आले, तर १२ वाहनमालकांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ती वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहनांच्या पुढील व मागील बाजूस अधिकृत नंबर प्लेट बसवूनच वाहन चालवावे. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.सदर मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव, गोरख जाधव तसेच होमगार्ड यांनी यशस्वीपणे राबविली.
कारवाई आणि दंड
७ जून : ५६ वाहने – ₹१,०८,५००,१८ जून : ४७ वाहने – ₹१,१०,०००,१९ जून : ५४ वाहने – ₹१,०२,०००,२० जून : ३० वाहने – ₹३०,०००,२१ जून : २७ वाहने – ₹३८,९००,२२ जून : ६६ वाहने – ₹१,१७,५००,२३ जून : ५६ वाहने – ₹६८,०००,२४ जून : ८२ वाहने – ₹६२,९००,२५ जून : ४९ वाहने – ₹६०,०००,२६ जून : ४३ वाहने – ₹६०,०००,२७ जून : १० वाहने – ₹५,०००,२८ जून : ६४ वाहने – ₹४५,०००,२९ जून : ५६ वाहने – ₹५६,५००.

COMMENTS