Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे

पाथर्डी/प्रतिनिधी ः राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना यांनी युतीत लढवल्या मात्र स्वतःच्या  स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांन

सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्षे
डॉ.सुजय विखे यांना धमकी देणार्‍यांवर कारवाई करा
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही ः खा. डॉ. सुजय विखे

पाथर्डी/प्रतिनिधी ः राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना यांनी युतीत लढवल्या मात्र स्वतःच्या  स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी युतीशी गद्दारी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करत जनतेचा मताच्या कौलाचा अपमान केला असून,नव्याने वर्षांपूर्वी सरकार स्थापन करत जनतेच्या अपमानाचा बदला या सरकारने घेतला असून आजच्या राजकीय परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. पाथर्डी येथे वयोश्री योजने अंतर्गत निःशुल्क सहायक उपकरण वितरण कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे बोलत होते. यावेळी आ.मोनिका राजळे, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, बंडू बोरुडे, माजी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी सभापती सुनीता दौड, अजय रक्ताटे, धनंजय बडे, अमोल गर्जे, संजय बडे, अशोक चोरमले,बाबा राजगुरू आदी जण उपस्थित होते.
   यावेळी पुढे बोलताना विखे यांनी म्हटले की, बहुजनांचे आणि सामान्य जनतेचे कल्याण करत असताना वाट्याला कितीही संघर्ष आला तरी न थांबता लढत राहिलं की जनता आपल्याला साथ देते हा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि कै.बाळासाहेब विखे पाटील आदर्श घेत मी राजकारणात काम करतो.आज समाजात अनेक श्रीमंत राजकारणी आहेत परंतु मुंडे साहेबांनी आणि विखे पाटलांनी माणूस धनाने आणि तर मनाने श्रीमंत असावा हे शिकवणीप्रमाणे आपण या कार्यक्रमाचे आयोजन स्वखर्चाने केले आहे गेल्या वर्षात तालुक्याचा विकास दुप्पट वेगाने केला.222 राष्ट्रीय महामार्गासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले असून आज तो पूर्ण झाला असून ही माझी उपलब्धी आहे.स्वातंत्र्यनंतर आज तिसगाव येथील अतिक्रमण काढले.अतिक्रमण काढून विकास होत असेल तर तो वाईटपणा कोणाला तरी घ्यावा लागेल तो वाईटपणा मी घेतला.आज अनेक जण माझ्यावर नाराज असतील पण मताची लाचारी पत्करून जो माणूस विकास थांबवतो तो माणूस लोकप्रतिनिधी होण्याच्या लायकीचा नाही हे माझे स्पष्ट मत आहे.मताच्या लाचारीसाठी तत्वाशी तडजोड न करता विकास थांबला नाही पाहिजे अशा पद्धतीचा विकास मला करायचा आहे. 222 चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हेलिकॉप्टर मध्ये येणार नाही असा मी शब्द दिला होता.आता काम पूर्ण झाले असून यापुढे मी पाथर्डीला हेलिकॉप्टरनेच येणार पण मी हेलिकॉप्टरने येत असलो तरी माझ्या दिव्यांग बांधवाला इलेक्ट्रिक गाडी देऊन हेलिकॉप्टरने फिरतो असा खासदार भारताने पहिल्यादा पहिला असेल.ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी कडून अपेक्षा ठेवाल त्या दिवशी तुमच्या तालुक्याचे चित्र बदलेल.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपाचे संघटनेने कष्ट घेतले.आज 800 दिव्यांगाना साहित्याचे वाटप आपण करतोय.सामन्यांचे कल्याण करण्यासाठी पैसा असून उपयोग नाही त्यासाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे. हे सरकार शेतकर्‍यांचे आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निश्‍चय करा.येणार्‍या निवडणुकीत तालुक्याची जनता सर्वात मोठी भूमिका पार पाडणार हा विश्‍वास व्यक्त करत, आजचे सरकार शेतकर्‍यांचे असून आजच्या दुष्काळ परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तिची आणि शेतकर्‍यांची जबाबदारी असून त्यापासून आम्ही पळणार नाही असा शब्द यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला.आभार शहराध्यक्ष अजय भंडारी यांनी मानले.

COMMENTS