Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोखले पुलाचे काम रखडण्याची चिन्हे

महानगरपालिकेने दिरंगाई केल्याचा आमदार साटम यांचा आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः अंधेरी पूर्व आणि पश्‍चिम भागाला जोडणार्‍या गोपाळकृरूण गोखले पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम रखडण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्

धक्कादायक…भाच्याचा मामीवर बलात्कार |LOKNews24
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गीगी हदीदला अटक
बड्या हॉस्पिटलच्या लिफ्टच्या लॉबीत रुग्णांवर उपचार

मुंबई/प्रतिनिधी ः अंधेरी पूर्व आणि पश्‍चिम भागाला जोडणार्‍या गोपाळकृरूण गोखले पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम रखडण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी जर काम झाले नाही तर, या कामाला नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील उताराचे कामही अपूर्ण असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

पुलाच्या दोन मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट्य होते. मात्र दोन मार्गिका सुरू होण्यास आता नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणार्‍या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. संपूर्ण पुलाची पुनर्बांधणी महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. मात्र पुलाच्या बांधकामाबाबत महानगरपालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. अंधेरी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावरून जाणार्‍या गोखले पूलाचा काही भाग जुलै 2018 मध्ये कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत दोन जण दगावले होते, तर पश्‍चिम रेल्वेची वाहतूक एक दिवस बंद ठेवावी लागली होती. दुर्घटनेनंतर रेल्वेने या पुलाची दोन्ही बाजूची मार्गिका बंद ठेवली होती. मार्गिकेची दुरुस्ती करून ती पादचार्‍यांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर पुलाच्या उताराच्या भागाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. या कामासाठी 2020 मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 18 महिने विलंबाने नोव्हेंबर 2021 मध्ये या कामाला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या हद्दीतील काम आता पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही, असे साटम यांनी पत्रात नमुद केले आहे. हा पूल नोव्हेंबर 2022 मध्ये धोकादायक बनला होता. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन पुलासाठी तुळई बनवून ती बसवण्याचे काम महानगरपालिका करणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट होते. तब्बल 90 मीटर लांबीच्या तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटची जोडणी करण्यात येणार आहे. हे सुटे भाग तयार करण्याचे काम चंदिगढ येथे करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी लागणार्‍या स्टीलच्या उत्पादकांचा संप सुरू असल्यामुळे हे काम रखडण्याची चिन्हे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. हे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर उजडण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. असे असले तरी महानगरपालिकेच्या हद्दीतील पुलाच्या कामासाठी इतका विलंब का, असा सवाल साटम यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून पुलाचे काम लवकर व्हावे याकरिता आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी यांनी केली आहे.

COMMENTS