भोकर : भोकर सार्वजनिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०६वी जयंती उत्सव मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड लहुजी चौक येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहप

भोकर : भोकर सार्वजनिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०६वी जयंती उत्सव मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड लहुजी चौक येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत सर्वानुमते विकास दिलीपराव वाघमारे यांची अध्यक्षपदी, तर अनिल नरसिंहराव डोईफोडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी बाळासाहेब टिकेकर, उपाध्यक्षपदी सुभाष आनंदराव भालेराव, ओमश्री सखाराम वाघमारे आणि बालाजी काळे, सहसचिवपदी संतोष अण्णा सूर्यवंशी, आकाश भालेराव आणि बंटी गायकवाड, तर कोषाध्यक्षपदी महेंद्र किणीकर यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या सदस्यपदी चंद्रकांत बावळे, संतोष झुंझार, बालाजी एडके, साईश्याम वाघमारे, रवी किणीकर आणि साईप्रसाद चंद्रभान यांची निवड झाली. मार्गदर्शक मंडळात उत्तम बाबळे, के. व्ही. देवकांबळे, दिलीप वाघमारे, अशोक वाघमारे, अरुण डोईफोडे, शाहीर माधव वाघमारे, देवराव मनपूर्वे, राजन्ना माहूरकर, अशोक निळकंठे आणि पांडुरंग वाघमारे यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व पत्रकारांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.
निवडीनंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS