Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोडेगाव परिसरात पोषण पंधरवडा उत्साहात 

घोडेगाव : बालकांचा सर्वांगीण विकास आणि कुपोषण मुक्तीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणारा पोषण पंधरवडा २०२६ सध्या घोडेगाव व परिसरात उत्साहात साजरा केला जात आहे. घोडेगाव गट व चांदा गट यांच्या वतीने  ९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या पोषण पंधरावड्याची मुख्य संकल्पना जन्मापासून पहिला ६ वर्षापर्यंतच्या मुलांच्या मेंदूचा विकास अशी आहे. बालकाची कुपोषण कमी करणे, मातांचे आरोग्य सुधारणे आणि समाजामध्ये पौष्टिक आहाराबाबत जागृता निर्माण करण्यासाठी घोडेगाव  व परिसरात पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. घोडेगाव गट व चांदा गट यांच्या माध्यमातून अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पंधरवड्या निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने घोडेगाव मधून प्रभात फेरी काढण्यात आली.  पौष्टिक पदार्थ कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक मातांना दाखविण्यात आले. घरोघरी परसबाग लावून विषमुक्त पालेभाज्याचे महत्व पटवून देण्यात आले. बालकांचे वजन व उंची मोजून त्यांच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या. तसेच गरोदर मातांना लोहयुक्त आहारचे महत्त्व सांगण्यात आले. या मोहिमेत घोडेगाव गट परिवेक्षिका सविता गोसावी व चांदा गट सुपरवायझर संगीता दळे तसेच घोडेगाव व चांदा गटातील अंगणवाडी सेविका व महिलांनी सहभाग नोंदवला.

सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
एकही बंजारा तांडा विकासापासून वंचित राहणार नाही – अमरसिंह पंडित46 लक्ष रुपये किंमतीच्या पोईतांडा तांडा येथे विविध विकास कामांचे भव्य शुभारंभ

घोडेगाव : बालकांचा सर्वांगीण विकास आणि कुपोषण मुक्तीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणारा पोषण पंधरवडा २०२६ सध्या घोडेगाव व परिसरात उत्साहात साजरा केला जात आहे. घोडेगाव गट व चांदा गट यांच्या वतीने  ९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या पोषण पंधरावड्याची मुख्य संकल्पना जन्मापासून पहिला ६ वर्षापर्यंतच्या मुलांच्या मेंदूचा विकास अशी आहे.

बालकाची कुपोषण कमी करणे, मातांचे आरोग्य सुधारणे आणि समाजामध्ये पौष्टिक आहाराबाबत जागृता निर्माण करण्यासाठी घोडेगाव  व परिसरात पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. घोडेगाव गट व चांदा गट यांच्या माध्यमातून अंगणवाडी स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पंधरवड्या निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने घोडेगाव मधून प्रभात फेरी काढण्यात आली. 

पौष्टिक पदार्थ कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक मातांना दाखविण्यात आले. घरोघरी परसबाग लावून विषमुक्त पालेभाज्याचे महत्व पटवून देण्यात आले. बालकांचे वजन व उंची मोजून त्यांच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या. तसेच गरोदर मातांना लोहयुक्त आहारचे महत्त्व सांगण्यात आले. या मोहिमेत घोडेगाव गट परिवेक्षिका सविता गोसावी व चांदा गट सुपरवायझर संगीता दळे तसेच घोडेगाव व चांदा गटातील अंगणवाडी सेविका व महिलांनी सहभाग नोंदवला.

COMMENTS