Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

संगमनेर शहरातील ढोलेवाडी याठिकाणी एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना 22 जुलै 2021 ते 28 जुलै 2021 या दरम्यान घडली 

रिपब्लिकन ऑफ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल.
महाराष्ट्राला हादरवणारी घटना !
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा

संगमनेर शहरातील ढोलेवाडी याठिकाणी एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना 22 जुलै 2021 ते 28 जुलै 2021 या दरम्यान घडली  आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच अनिल छबू ढोले याला संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी संगमनेर शहरातील ढोलेवाडी या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. अनिल छबू ढोले याने अल्पवयीन मुलीची आई बाहेरगावी गेल्याने अनिल याने घरामध्ये घुसून या अल्पवयीन मुलीवर 22 जुलै 2021 ते 28 जुलै 2021 यादरम्यान तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अनिल ढोले याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पोलीस उपनिरीक्षक शिका निकिता महाले या करत आहे

COMMENTS