बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा

नाशिककरांसाठी मंगळवार ठरला संमिश्र घटनांचा साक्षीदार नाशिक/प्रतिनिधी कुठला दिवस कुठली बातमी घेऊन उगवेल याचा काही भरवसा नसतो,कधी आनंदाची तर दुःख

विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Nashik : इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेचा बैलगाडी मोर्चा (Video)
छगन भुजबळांनी फटाके विक्रीवरील बंदी उठवली | Nashik

नाशिककरांसाठी मंगळवार ठरला संमिश्र घटनांचा साक्षीदार

नाशिक/प्रतिनिधी

कुठला दिवस कुठली बातमी घेऊन उगवेल याचा काही भरवसा नसतो,कधी आनंदाची तर दुःखाची बातमी येते.तर कधीकधी काही घटना निखळ करमणूक करून जातात.नाशिककरांसाठी या साऱ्या भावना सोबत घेऊन मंगळवार मावळतीला गेला.

मंगळवार उजाडल्यानंतर नाशिककर आपआपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त  असतांना नवीन नाशिक परिसरातील पवननगर परिसरात असलेल्या एका ब्युटीपार्लरमध्ये एका नराधमाने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची बातमी कानावर आली.

 पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. ब्युटीपार्लरमध्ये पूजा करत असताना दुकानात शिरुन आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत तिच्यावर अत्याचार केला आहे.

या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत.पोलीसांची पाच पथके रजीत आरोपीचा  शोध घेत आहेत.घटनेचे वृत्त पोलीस आयुक्तांनी अंबड पोलीस ठाण्याला भेट दिल्याचे वृत्त आहे.

मंगळवारचा सुर्य माध्हानांहून मावळतीकडे झुकत असतांना आणखी एक बातमी आली.या बातमीने नाशिककरांना जरा हायसे वाटले. पहिली बातमी वाचली त्याच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच वर्षापुर्वी घडलेल्या एका गुन्ह्यातील टिप्पर गँगच्या आरोपीतांना तब्बल दहा वर्षांची सजा ठोठावली गेली.

 पाच लाखांची खंडणी न दिल्यास आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देत युवकावर प्राणघातक हल्ला करुन जीवे ठार मारल्याप्रकरणी सिडकोतील कुख्यात टिप्पर गँगच्या   गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, , मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, या   तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांन्वये सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच एकूण २५ लाख १७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सिडकोसह शहराच्या विविध भागात दहशत असणाऱ्या या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ३) न्यायाधीश व्ही.पी. देसाई यांनी आज (दि.२८) हा निकाल दिला. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता सुधीर कोतवाल यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला.

टिप्पर टोळीविरुद्ध शहरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३(१)(¡¡),३(२),३(४) अन्वये कारवाई केली होती.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त अतुल झेंडे, उपनिरीक्षक रविंद्र सहारे, विशाल मुळे व सहकाऱ्यांनी करत टोळीप्रमुख गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळ, मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, हेमंत बापू पवार ऊर्फ सोन्या अणि इतर संशयित आरोपींवर मोक्कान्वये दोषारोपत्र दाखल केले होते.

सायंकाळी तीसरी बातमी आली.या बातमीने नाशिक शहरच नव्हे तर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.बातमीचा आशय आहे,नांदगावचे आ.सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीचा हस्तकाने धमकी दिली.निमित्त आहे ना.छगन भुजबळ आणि आ.सुहास कांदे याच्यातील वादाचे.आ.कांदे यांनी ना.भुजबळांविरूध्द  दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून ही धमकी आल्याचे कांदे समर्थकांचे म्हणणे आहे.यासंदर्भात पोलीसांत तक्रार झाल्याचेही समजते.या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.सुहास कांदे यांना धमकी येणे हेच हास्यास्पद असल्याचे सांगीतले जातेय.तर दुसऱ्या बाजूला ना.छगन भुजबळ असा बालीश उद्योग करण्याची सुतराम शक्यता नसल्याचेही बोलले जात असल्याने गोतावळ्यातून कुणीतरी भुजबळांना अडचणीत आणण्यासाठी हा उद्योग केला नसेल ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

COMMENTS