Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कर्जत : तालुक्यातील दुरगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दूरगाव ते कुळधरण जाणाऱ्या रस्त्यावर  निर्जन भागात हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून तेल आणण्याच्या बहाण्याने नेले आणि निर्जन ठिकाणी नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केला, तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी २२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी   कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेवर उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे वैद्यकीय उपचार व तपासणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
डॉक्टरची दीड कोटींची फसवणूक
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये लेडीज स्पेशल ऑपरेशन ; सोन्याची बॅग उडाली, प्रवासी हादरले

कर्जत : तालुक्यातील दुरगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी  आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दूरगाव ते कुळधरण जाणाऱ्या रस्त्यावर  निर्जन भागात हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून तेल आणण्याच्या बहाण्याने नेले आणि निर्जन ठिकाणी नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केला, तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या अत्याचारामुळे पीडित मुलगी २२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी   कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेवर उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे वैद्यकीय उपचार व तपासणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS