Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर्थ वाकचौरे यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रीय सन्मान

पुणे : कृषी क्षेत्रातील अभिनव आणि परिणामकारक कामगिरीबद्दल अश्‍वमेध समूह ऑफ कंपनिजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. समर्थ वाघचौरे यांना भारतीय कृषी संश

आदित्य कृषी महाविद्यालयात 257 विद्यार्थ्यांना निरोप; संस्कारांची शिदोरी घेऊन भावी अधिकारी नव्या क्षितिजाकडे
दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार
हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना

पुणे : कृषी क्षेत्रातील अभिनव आणि परिणामकारक कामगिरीबद्दल अश्‍वमेध समूह ऑफ कंपनिजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. समर्थ वाघचौरे यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत कार्यरत ‘नॅशनल ब्युरो ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल्ली इम्पॉर्टंट मायक्रोऑगनिझम्स’ (आयकार-एनबीएआयएम) यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वाघचौरे यांनी जैवखतांच्या प्रभावी वापरातून शेतकर्‍यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले असून खर्चातही बचत झाली आहे. त्यामुळेच ते शेतकर्‍यांमध्ये शेतकर्‍यांचा मित्र म्हणून ओळखले जातात. सन 2023 मध्ये श्रीलंकेत उद्भवलेल्या कृषी संकटाच्या काळात त्यांनी पुढाकार घेत तेथील शेतकर्‍यांना प्रथमच जैवखते उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे संकटग्रस्त शेतकर्‍यांच्या उपजीविकेला मोठा दिलासा मिळाला आणि त्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली. सध्या देशात मातीची घटती सुपीकता आणि शाश्‍वत शेतीची गरज ही मोठी आव्हाने असताना, वाघचौरे शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष गरजा समजून घेऊन त्यांच्यासोबत कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाश्‍वत शेतीचा मार्ग अधिक सक्षम होत असून भारतीय कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी ते मोलाचे योगदान देत आहेत. आयकार-एनबीएआयएमचे संचालक डॉ. अशोक श्रीवास्तव आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. शाश्‍वत शेतीच्या दिशेने कार्य करणार्‍या तरुण संशोधक आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. दरम्यान, अश्‍वमेध समूहाच्या वतीने वाघचौरे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच अम्मा असोसिएशनचे अध्यक्ष आणि अश्‍वमेध समूहाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS