Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अम्मा असोसिएशनची शाश्‍वत कृषी विकासात मोठी झेप; अध्यक्ष डॉ. वाघचौरे आणि सचिव डॉ. धारणकर यांचा पुढाकार

नाशिक : सेंद्रिय शेती, संशोधन आणि शाश्‍वत कृषी विकासाच्या क्षेत्रात गेल्या दशकभरात अम्मा असोसिएशनने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नव्या कार्यकार

उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्‍यांना दिलासा
शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची डॉ. अशोक सोनवणे यांची भेट

नाशिक : सेंद्रिय शेती, संशोधन आणि शाश्‍वत कृषी विकासाच्या क्षेत्रात गेल्या दशकभरात अम्मा असोसिएशनने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या काळात संस्थेने शेतकरी, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यातील दुवा अधिक भक्कम करत शाश्‍वत शेतीच्या प्रसाराला गती दिली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे आणि सचिव डॉ. प्रशांत धारणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत जैविक शेतीचे महत्त्व पोहोचविण्यासाठी देशातील सात कृषी विद्यापीठे, तीन राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांसह इतर संशोधन केंद्रांबरोबर सहकार्य करार करण्यात आले. या माध्यमातून संशोधनाला व्यापक दिशा मिळाली असून शाश्‍वत शेतीच्या धोरणाला चालना मिळाली आहे. संस्थेमार्फत देश-विदेशात प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. शाश्‍वत शेती हीच भविष्यातील दिशा या संकल्पनेतून नोंदणीकृत उत्पादने विकसित करण्यात आली असून चालू हंगामात ती शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होणार आहेत. डॉ. प्रशांत धारणकर यांनी संघटनेच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत जैविक कीटकनाशकांच्या नोंदणी प्रक्रियेला गती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य कंपन्यांना नऊ जैविक कीटकनाशकांच्या नोंदणीचा टप्पा गाठता आला आहे. या कार्यात उपाध्यक्ष डॉ. रामनाथ जगताप, डॉ. लक्ष्मण डोळे, कोषाध्यक्ष डॉ. विश्‍वास सोंडकर तसेच सौ. गीता सारथे यांचे सहकार्य लाभले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वयक म्हणून सौ. राखी भट्टड यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या दशकभरातील कार्यातून असोसिएशनने भक्कम पाया उभारला असून भविष्यातही संशोधन, नवकल्पना आणि शेतकरी विकासाच्या दिशेने मोठी प्रगती साधली जाईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. कृषी क्षेत्रातील या कामगिरीबद्दल विविध मान्यवरांकडून अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS