Homeताज्या बातम्या

रांजणगावच्या सरपंच संध्याताई देशमुख आणि ग्रामविकास अधिकारी गोरख गायकवाड यांना ‘सह्याद्री रत्न’ पुरस्कार जाहीर

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगावच्या सरपंच संध्याताई महेश देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजोपयोगी कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत

दिव्यांगी लांडे हिला सिनिअर राष्ट्रीय ऍथलेटिक्समध्ये ब्राॅन्झ; अहिल्यानगरच्या ‘एक्सप्रेस’ची भुवनेश्वरमध्ये दमदार कामगिरी
शेतकर्‍यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
राजीनामा द्या आणि संघात प्रवेश करा! राज ठाकरेंनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना फटकारले

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगावच्या सरपंच संध्याताई महेश देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजोपयोगी कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न गुण गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारी यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.

संध्याताई देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या ग्रामविकासातील सक्रिय सहभागाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी गोरख अर्जुन गायकवाड यांनाही त्यांच्या विशेष कर्तव्यदक्षतेबद्दल ‘सह्याद्री रत्न गुण गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

या दोन्ही मानचिन्हप्राप्त मान्यवरांचे रांजणगावचे उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी सरपंच शरद सरोदे, बाबा जवक, बंटी साबळे, महेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल जवक, पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंदे पाटील आणि पारनेर दूध संघाचे दत्ता नाना पवार यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.

COMMENTS