Homeताज्या बातम्या

कोपरगावात विविध अवैध धंद्यांवर एलसीबीचे छापे; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ आरोपींवर ५ गुन्हे दाखल

कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)

जंतरमंतरपासून मुंबईपर्यंत : विद्यार्थी आंदोलनांची लाट!
आंबीत धरण ओव्हरफ्लो! मुळा नदीला नवसंजीवनी; भंडारदरा धरणातही नव्याने पाण्याची आवक
पाहणी झाली; पण सुविधा कधी? किनवट रेल्वे स्थानकावरील गैरसोयींवर प्रवाशांचा संताप

कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचवेळी पाच ठिकाणी धडक छापेमारी करत अवैध गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, २ लाख १४ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, विजय ठोंबरे, अभिजीत अरकल, अशोक लिपणे, रणजीत जाधव आणि अमृत आढाव यांच्या पथकाने १ ऑगस्ट रोजी कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी एकाचवेळी धाडसत्र राबविले.

या कारवाईत गुटखा विक्री करणाऱ्यांवर तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. गुटखा विक्री प्रकरणात अभिजीत ठाकरे, नदीम शेख, अल्ताफ मनियार, अरिफ पठाण यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गणेश गर्जे, विनोद आहिरे, प्रसाद पेंढारे, सोमनाथ महाजन आणि रविंद्र तेलोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

छापेमारीदरम्यान गुटखा, रोख रक्कम, जुगार साहित्य व इतर साहित्य असा २ लाख १४ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील इतर भागातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS