Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बर्दापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

बर्दापूर प्रतिनिधी - तालुक्यातील बर्दापूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.साह

देशमुख-मलिकांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली
अनिलकुमार गायकवाड यांना ‘समृद्धी’साठी मुदतवाढ
टाळ मृदुंगाच्या गजरात अंबानगरीत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत

बर्दापूर प्रतिनिधी – तालुक्यातील बर्दापूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे 103 वी जयंती उत्सव बर्दापूर येथे साजरी करण्यात आली बर्दापूर येथे 20/08/2023 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बर्दापूर पोलीस स्टेशनचे स. पो .निरीक्षक महेंद्रसिंग ठाकुर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी बर्दापूर येथील  विकास काका मोरे पाटील ,यांची प्रमुख उपस्थितीती होती तसेच उपसरपंच आफरोज मणियार, मुंकूद दादा सिनगारे,लतीफ खुरेश,सुमीत तात्या मोरे, चंदकांत गंडले शरद शेरेकर सुनिल गंडले अभिजीत मोरे संभाजी मोरे गोविंद आनंत मोरे सुनिल ( सोन्या ) मोरे धनंजय देशमुख जवळगावकर यांच्यासह इतर मान्यवराच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले .या वेळी उत्सव समीतीच्या वतिने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते .तसेच जयंती उत्सव समीतीच्या वतिने भोजनाची व्यावस्या करण्यात आली होती . तसेच साहीत्यरत्न  लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची  गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती जयंती उत्सव समीतीचे संजय जोगदंड,सुदाम जोगदंड, साहेबराव जोगदंड,अशोक जोगदंड, सतीश ईचके, श्रीहरी जोगदंड, बाबासाहेब जोगदंड,शकंर जोगदंड, यांनी व इतर नागरीकांनी परिश्रम घेतले असून जयंती शांततेत संपन्न झाली या वेळी बर्दापूर पोलीस स्टेशनचे स.पो.निरीक्षक महेंद्रसिंग ठाकुर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या वेळी स.पो उप निरीक्षक लक्ष्मण बिडगर . बर्दापूर बिट अमलदार पो.हे.कॉ. श्रीराम चेवले पो.ना.अर्जुन राठोड हे उपस्थित होते.

COMMENTS