Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध

पाचगणी / वार्ताहर : स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत स्वच्छ व सुंदर पांचगणी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी पांचगणी नगरपरिषदेत मेकॅनिकल रोड

पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा
पाटण तालुक्यात काँगे्रस शून्यातून विश्‍व निर्माण करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक

पाचगणी / वार्ताहर : स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत स्वच्छ व सुंदर पांचगणी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी पांचगणी नगरपरिषदेत मेकॅनिकल रोड स्विपिंग पाच मशीन उपलब्ध झाल्याने शहरांतर्गत महत्वाचे रस्ते व अंतर्गत रस्ते स्वच्छतेतून निर्मळ होणार असल्याने स्वच्छ सर्वेक्षणात पांचगणी पर्यटन स्थळ अधिक गतिमान होणार आहे.
पांचगणी पर्यटन स्थळ अगोदरच देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणात आपला डंका वाजवीत आहे. आजच स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अंतर्गत रस्ते स्वच्छ करणारी मकेनिकल मशीन पांचगणी पालिकेत उपलब्ध झाल्या आहेत. रोड मेकॅनिकल स्विपिंग मशीनचे प्रत्यक्ष नगरपरिषद रस्त्यावर प्रात्यक्षिक देत लोकार्पण मुख्याधिकारी गिरिष दापकेकर, यांनी केले त्यांच्या सोबत कार्यालयीन अधिकार्‍यांनी मशीन चालवित प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये
अधीक्षक दिलीप रणदिवे, मुकुंद जोशी, आरोग्य अधिकारी सुरेश मडके, रवी कांबळे, गणेश कासुर्डे, अभियंता निखिल पवार, अनिल चव्हाण, विकी चव्हाण उपस्थित होते.
नगरपरिषदेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत रस्ते स्वच्छतेकरिता पाच मेकॅनिकल स्विपिंग मशीन खरेदी केल्या आहेत. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही स्वच्छ होणार आहेत. यामुळे पांचगणी शहरामधील रस्ते चकाचक रहाणार आहेत.


मेकॅनिकल रोड स्विपिंग मशिन हे पर्यटन नगरी पांचगणीच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल आहे. मशिनच्या माध्यमातून कचरा मुक्त होणार आहेत. शहर स्वच्छतेत पांचगणी नगरपरिषद आता हायटेक होत असून स्वपिंग मशीनच्या माध्यमातून रस्ते चकाचक होणार आहेत. तर स्वच्छ सर्वेक्षण अभिआयनास या निमित्ताने गती प्राप्त होणार आहे.
10-5

COMMENTS