Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षांचे दिवस असल्याने ध्वनी प्रदूषण थांबवा

मशिदींवरील भोंग्यांना आक्षेप, मनसे विद्यार्थी सेनेचे निवेदन

अहमदनगर/प्रतिनिधी ः सध्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे दिवस सुरू आहेत व विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणासारख्या गोष्टींचा नाहक त्रास हो

अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत
वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी
कर्जत-जामखेडच्या 158 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार

अहमदनगर/प्रतिनिधी ः सध्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे दिवस सुरू आहेत व विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणासारख्या गोष्टींचा नाहक त्रास होत आहे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांच्यासाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषण थांबवा, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या मशिदींतून न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात दिवसांतून 5 वेळा मोठयाने अजान दिली जात आहे.

परीक्षांच्या काळात तरी संबंधितांनी नियमात राहायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे अनेक विद्यार्थी आणि खासगी क्लासेसच्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत आणि सर्वसामान्य लोक या मशिदींवरील भोग्यांच्या आवाजाबाबत काही बोलू शकत नाही याचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत, असा दावाही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वर्मा यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव डॉ. संतोष साळवे, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, स्वप्निल वाघ, प्रकाश गायकवाड, प्रवीण गायकवाड, प्रमोद ठाकूर, दीपक मगर, अभिजीत बेरड, तेजस भिंगारे, राहुल वर्मा, अभिषेक कलमदाने आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक खैरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे दिवस परीक्षेचे दिवस सुरू असल्याने शहरातील मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनी प्रदूषण त्वरित थांबवा, अशी मागणी केली आहे.

याबाबत वर्मा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीबाबत ज्या डेसिबलच्या मर्यादा आणि नियम आखून दिलेले आहेत, त्या शासनाकडून तपासल्या गेल्या तर सर्वच मशिदींवर कारवाई होईल. जसे काही अजानची स्पर्धा लागलेली आहे अशा पद्धतीने गोंगाट करतात, हे योग्य नाही. एकाच भागात 10 मशिदींचा एकाच वेळी तेही दिवसांत 5 वेळा जोरात आवाज होत असेल याची कधी तरी चौकशी करून कारवाई केल्याशिवाय ही मंडळी सुधारणार नाही, असा दावा करून ते म्हणाले, किती मशिदींनी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कायद्याचा धाक सर्वांना समान असला पाहिजे हिंदू बांधवांच्या कोणत्याही मिरवणुका आल्या की तिथे डेसिबल मशिन घेऊन अधिकारी येतात, पण हे अजान मोठया आवाजात चालतात, तेव्हा का कारवाई केली जात नाही?, असा सवालही त्यांनी केला.विशिष्ट पंथाच्या लोकांसाठी अजान आहे तर याचा इतर धमियांना त्रास का ? 365 दिवसात रोज 5 वेळा म्हणजे 1625 वेळा मोठ्याने अजान देऊन इतरांना त्रास देण्यात काय अर्थ आहे? नियम आखून दिले आहेत तर याची अंमलबजावणी पण झालीच पाहिजे. प्रशासनाचा धाक नसला की राजकीय हस्तक्षेप करावा लागतो आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याच्या नोटीसा आम्हा लोकांना दिल्या जातात. पण, त्या आधीच प्रशासनाने हे भोंगे बंद करावे. अन्यथा सामूदायिक हनुमान चालिसाचा प्रयोग आम्ही पुन्हा सुरू करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने सुमित वर्मा यांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 मंदिरांवरील भोंग्यांचाही होतो त्रास – नगर शहरातील मध्यवस्तीतील काही नागरिकांनीही मनसेला निवेदन देऊन मंदिरांवरील भोंग्यांच्या आवाजामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. घुमरेगल्ली, अर्बन बँक रोड, महाजन गल्ली, नवी पेठ, गांधी मैदान व परिसरातील नागरिकांनी गांधी मैदानाजवळील मशिदीवर व अर्बन बँक रोडवरील अमृतेश्‍वर मंदिरावर बेकायदेशीर ध्वनीक्षेपक लावल्याचा दावा केला आहे. या दोन्हीही बेकायदेशीर ध्वनीक्षेपनामुळे दिवसातून अनेकवेळा नागरिकांना त्रास होतो. तसेच दहावी-बारावी परीक्षा सुरू होत असल्याने अभ्यासाला या ध्वनीक्षेपकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे कोतवाली पोलिस ठाण्यात आमची ही तक्रार आपल्या माध्यमातून पोहोचवावी, अशी मागणीही या नागरिकांनी मनसेकडे केली आहे.

 सही करायलाही कोणी तयार नाही – मंदिर-मशिदींवरील भोंगे व त्यांच्याद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत सोशल मिडियातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यातील एका प्रतिक्रियेत, तक्रारीवर सह्या करायलाही कोणी तयार होत नाही, असा उद्वेग व्यक्त केला गेला आहे. यात म्हटले आहे की, दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. पण, अभ्यासासाठी मुलांना एकाग्रता मिळणे मुश्कील झाले आहे. मंदिर आणि मशिदींवर असणारे बेकायदेशीर ध्वनीक्षेपक काढावे व कायद्याची अंमलबजावणी व्हावी असे कोणत्याही पोलिस खात्यास वाटत नाही.

नागरिकांची तक्रार करायची हिंमत होत नाही. धार्मिक भावना दुखावतात. या प्रश्‍नांना वाचा फोडावी म्हणून एक निवेदन तयार केले होते. पण, त्या निवेदनावर सही करायला कोणी तयार होत नाहीत, असे स्पष्ट करून पुढे म्हटले आहे की, मुंगीच्या पायात घुंगरू बांधले तरी त्या घुंगरूचा आवाजही अल्ला-ईश्‍वरापर्यंत पोहोचेल. त्यासाठी मोठमोठ्याने नामस्मरण करण्याची काहीच गरज नाही, हा अर्थ आहे, संत कबीरांच्या एका दोह्याचा. पण, संत कबीरांना काय माहिती की, भविष्यात घुंगरूंना बाजूला काढून सर्व धर्मांचे ठेकेदार आपापल्या धर्मस्थानांवर कर्णकर्कश्य आवाजाचे भोंगे लावून आपल्या अल्ला-ईश्‍वरालही कानात बोटे घालायला भाग पाडतील. कलियुगात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारुन सर्वंच धर्माचे रक्षक रस्ते अडवून आम्हीच धर्माचे अभिमानी आहोत आणि जे विरोध करतील ते काफर-धर्मद्रोही आहेत असे सांगून धर्मानेच आम्हाला अशा गद्दारांना शिक्षा अधिकार दिल्याचे सांगत आहेत.

या धर्मांध लोकांच्याविरोधात स्वतःला शांतताप्रिय म्हणवणार्‍या कोणाचीही तक्रार करायची हिंमत होत नाही. पोलिस खातेही कोणी लेखी तक्रार केली तरच आम्ही त्याची दखल घेऊ असे सांगण्याची हिंमत करीत आहेत. आपण नगरकर सहनशील आहोत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधींची शहराच्या विकासाबाबतची अनास्था आपण वर्षानुवर्षे सहन करीत आहोत. ही सहनशीलता आपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित करण्यातच धन्यता मानीत आहोत. आपल्याला कोणाचाच राग येत नाही. आपण सर्वच ’स्थितप्रज्ञ’ अवस्थेत गेलो आहोत, असा उद्वेगही सोशल मिडियातील या पोस्टमध्ये व्यक्त केला गेला आहे.

COMMENTS