अहिल्यानगर : किल्ले भुदरगडच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून सुमारे ५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांच्या कार्याची पंचायत समिती भुदरगडने दखल घेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.पंचायत समितीच्या दिनांक १ जून रोजी झालेल्या सभेत अभिनंदनीय ठराव मांडण्यात आला. या ठरावात खासदार नीलेश लंके यांनी भुदरगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने भुदरगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुमारे ५.५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल सभागृहाने समाधान व्यक्त केले.इतिहास व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी खासदार लंके यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील ऐतिहासिक वारसा संवर्धनाला नवी दिशा मिळाल्याचे मत ठरावात व्यक्त करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही अशाच पद्धतीने ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.सदर अभिनंदनीय ठराव पंचायत समिती सदस्य रूपाली बजरंग कुरळे यांनी सूचित केला असून धनंजय मधुकर लाड यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहाने हा ठराव सर्वानुमते मंजूर केला.

COMMENTS