Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये अनैतिक संबंधातून खून?मुलीला संशय ; चौकशीची मागणी, ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा

कर्जत : कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील भीमराव बाबा शेटे यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून, हा मृत्यू नैसर्गिक नसून अनैतिक संबंधातून

पाटोदा सुविधा केंद्रात कामगारांची लूट थांबवा; दोषींवर तात्काळ कारवाई करा – सचिन बोबडे
शिक्षणाधिकारी व शिक्षक सेनेत वादाचा प्रकार; निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप, शिक्षकांमध्ये असंतोष
आश्रमशाळा अधीक्षकांचे जीवन वेठबिगारीसारखे; 24 तास ड्युटीमुळे आरोग्य धोक्यात – संघटनेचा शासनाला इशारा
विवाहित मुलीच्या अनैतिक संबंधातून माय लेकींचा खून | Navarashtra

कर्जत : कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील भीमराव बाबा शेटे यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून, हा मृत्यू नैसर्गिक नसून अनैतिक संबंधातून खून झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलीने केला आहे. या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांची भेट घेतली. तसेच योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
मृतक भीमराव शेटे यांचा मृत्यू गुरुवारी (दि. १६) झाला. याबाबत माहिती मिळताच त्यांची मुलगी शारदा सूर्यवंशी घटनास्थळी पोहोचली असता, गावाबाहेर  वस्तीच्या मैदानात वडिलांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे तिने सांगितले. चेहऱ्यावर रक्ताचे डाग, डोक्यावर गंभीर जखमा, पाठ काळी-निळी पडलेली, हात-पाय व मांडीवर जखमा तसेच पायाच्या घोट्याला इजा झालेली असल्याचे तिने नमूद केले. या सर्व बाबी पाहता हा मृत्यू नैसर्गिक नसून खूनच असल्याचा आरोप तिने केला आहे.
शारदा सूर्यवंशी यांनी सांगितले की, घटना घडताच पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र तीन दिवस उलटूनही तपासात अपेक्षित गती दिसून आली नाही. त्यामुळेच आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह डीवायएसपी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रकरणात संशयित महिलेचे मागील तीन ते चार महिन्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, तसेच घटनेचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पोपट शेटे यांनी सांगितले की, मृत्यूबाबत अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून, काही छायाचित्रात्मक पुरावे देखील उपलब्ध आहेत. हे सर्व पुरावे डीवायएसपी यांना सादर करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष व जलद चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत नेटके, शहराध्यक्ष राहुल पोळ, युवक अध्यक्ष पप्पू चव्हाण, नारायण बाबा शेटे, भाऊसाहेब जावळे यांच्यासह पदाधिकारी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आता पोलिस तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS