Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी

शिक्रापूर / प्रतिनिधी शिरुर तालुक्यातील एका बड्या उद्योजकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून सव्वा कोटी रुपये उकळून देखील पुन्हा धमक्या द

प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध
दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (Video)
पत्नीचा गळा आवळून गुजरातला पळाला

शिक्रापूर / प्रतिनिधी शिरुर तालुक्यातील एका बड्या उद्योजकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून सव्वा कोटी रुपये उकळून देखील पुन्हा धमक्या देऊन पन्नास लाखांची खंडणी मागणार्‍या बंटी बबली दांपत्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर व हिरामण केरबा शेंडकर असे या बंटी बबली दाम्पत्याचे नाव आहे.
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील सदर उद्योजकाची जमीनीच्या व्यवहारातून धायरी येथील रक्षणी उर्फ गौरी शेंडकर या महिलेशी ओळख झालेली होती, त्यांनतर गौरी या महिलेने उद्योजकाशी ओळख वाढवून भेटी घडवून आणल्या त्यांनतर रक्षणीहिच्या पोटाच्या आजार पणातील शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगून एक लाख रुपयांची मदत मागितली दरम्यान उद्योजकाने तिला सदर मदत केली त्यावेळी महिलेने उद्योजकासोबत मैत्रीच्या नात्याने काही फोटो काढले मात्र त्यांनतर काही दिवसातच तिने तिचे काही फोटो उद्योजकाला पाठवून नंतर पतीने सर्व पाहिले असा धाक दाखवत पंधरा लाख रुपये दे अन्यथा फोटो व्हायरल करेल अशी धमकी देत पंधरा लाख रुपये घेतले, नंतर पुन्हा सदर महिलेने पतीच्या मदतीने फोटो गावातील लोकांना पाठवेल, तुझ्यावर ट्रॉसिटी व बलात्काराची केस करेल अशा धमक्या देत तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपये उकळले मात्र त्यांनतर देखील पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, त्यामुळे घडलेल्या प्रकाराबाबत सदर उद्योजकाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर व हिरामण केरबा शेंडकर दोघे रा. भवंतक बिल्डींग धायरी पुणे या दांपत्यावर गुन्हे दाखल करत रक्षणी उर्फ गौरी हिरामण शेंडकर हिला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत आहे.

COMMENTS