जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खर्डा येथे भटके विमुक्त आदिवासी समुदायाच्या वतीने प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी “महापुरुषांचे विचारच वंचित घटकांना न्याय देऊ शकतात,” असे प्रतिपादन ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह रजपूत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भटके विमुक्त समुदायाने आयोजित केलेला हा प्रबोधन मेळावा आदर्शवत असल्याचे सांगत, प्रत्येक समाजाने अशा उपक्रमांद्वारे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही मूल्ये समाजापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन केले. मार्गदर्शन करताना ऍड. डॉ. जाधव म्हणाले, “मी स्वतः भटके विमुक्त समाजातून आलो असून शिक्षणामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणून आपल्या मुलांना शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. शिक्षण न घेतले असते तर आजही माझी अवस्था पालामध्येच राहिली असती. माझा जन्म वंचित, कष्टकरी आणि शेतकरी घटकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी झाला असून पुढील आयुष्यही त्यासाठीच वाहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सुनील लोंढे, पत्रकार संतोष थोरात, बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, शाहीर बाबासाहेब राजगुरू, सलीम मदारी, आरोग्य सल्लागार सचिन पवळ तसेच शिक्षक जाहीर शेख व धनसिंग साळुंके यांनीही महापुरुषांच्या विचारांवर प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता इंगळे व रिजवान बागवान यांनी केले. प्रस्तावना विशाल पवार यांनी तर आभार गणपत कराळे यांनी मानले. हा कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र आणि कोरो इंडिया संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऋषिकेश गायकवाड, पांडुरंग शिंगांणे, गणेश जाधव, कांतीलाल जाधव, लक्ष्मण भोसले, लखोपती गोलेकर, पूजा पवार, आशा जाधव, फकीर मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, रुकसाना मापाडी आदी उपस्थित होते.

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खर्डा येथे भटके विमुक्त आदिवासी समुदायाच्या वतीने प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी “महापुरुषांचे विचारच वंचित घटकांना न्याय देऊ शकतात,” असे प्रतिपादन ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह रजपूत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भटके विमुक्त समुदायाने आयोजित केलेला हा प्रबोधन मेळावा आदर्शवत असल्याचे सांगत, प्रत्येक समाजाने अशा उपक्रमांद्वारे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही मूल्ये समाजापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन केले.
मार्गदर्शन करताना ऍड. डॉ. जाधव म्हणाले, “मी स्वतः भटके विमुक्त समाजातून आलो असून शिक्षणामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणून आपल्या मुलांना शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. शिक्षण न घेतले असते तर आजही माझी अवस्था पालामध्येच राहिली असती. माझा जन्म वंचित, कष्टकरी आणि शेतकरी घटकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी झाला असून पुढील आयुष्यही त्यासाठीच वाहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सुनील लोंढे, पत्रकार संतोष थोरात, बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, शाहीर बाबासाहेब राजगुरू, सलीम मदारी, आरोग्य सल्लागार सचिन पवळ तसेच शिक्षक जाहीर शेख व धनसिंग साळुंके यांनीही महापुरुषांच्या विचारांवर प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता इंगळे व रिजवान बागवान यांनी केले. प्रस्तावना विशाल पवार यांनी तर आभार गणपत कराळे यांनी मानले. हा कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र आणि कोरो इंडिया संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ऋषिकेश गायकवाड, पांडुरंग शिंगांणे, गणेश जाधव, कांतीलाल जाधव, लक्ष्मण भोसले, लखोपती गोलेकर, पूजा पवार, आशा जाधव, फकीर मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, रुकसाना मापाडी आदी उपस्थित होते.

COMMENTS