Homeताज्या बातम्या

आयआयटी मुंबई येथे विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहातील खोलीत घेतला गळफास

मुंबई: देशातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्य

जंतर-मंतरवर पुन्हा वाढली आंदोलनाची धार; हजारो विद्यार्थी जमले एकत्र, पोलिसांचा मोठा ताफा तैनात
माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; नाशिकमध्ये गोदावरीला पूर, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ,  पोलीस तपास सुरू! Mumbai Marathi News | Mumbai: IIT Bombay Student Found  Dead; Suicide Suspected | Latest Mumbai ...

मुंबई: देशातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी रात्री पवई येथील संस्थेच्या वसतिगृह क्रमांक ४ मधील एका खोलीत संबंधित विद्यार्थ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत कळवले.

पवई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण शोधण्यासाठी पुढील सखोल तपास सुरू केला आहे.

COMMENTS