Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलुतेदार संस्था अध्यक्षपदी दिगंबर नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी बबन पवार

पाटोदा:पाटोदा , शिरूर ता.औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था म.ता.पाटोदा या संस्थेच्या 2025-26 ते 2030-31 पंचवार्षिक साठी झालेल्या न

भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी;सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश
सामनगावच्या सरपंच-उपसरपंचांविरोधातील ‘अविश्वास’ मंजूर
शेतकरी हितासाठी विधान परिषदेत आवाज बुलंद करणार : आमदार विवेक कोल्हे ; शेतमालाच्या योग्य बाजारभावासाठी लढणार

पाटोदा:
पाटोदा , शिरूर ता.औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था म.ता.पाटोदा या संस्थेच्या 2025-26 ते 2030-31 पंचवार्षिक साठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिगांबर नाईकनवरे यांची तर उपाध्यक्षपदी बबन पवार यांची अविरोध निवड करण्यात आली.
पाटोदा -शिरुर तालुका कार्यक्षेत्र असणर्‍या या संस्थेच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक पार पडली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती त्यानंतर अध्यक्ष – उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली यामध्ये अध्यक्षपदासाठी दिगांबर नाईकनवरे यांचा तर उपाध्यक्ष पदीसाठी बबन पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने अध्यक्ष म्हणून दिगांबर नाईकनवरे तर उपाध्यक्ष म्हणून बबन पवार यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी संचालक सर्वश्री शिवाजी डीडूळ, दिनेश नारायणकर, नवनाथ भालेकर, हरिभाऊ मस्के,दगडु (बाळासाहेब) शिरोळे, महादेव अडागळे,सौ.रेखा दत्तात्रय नागथई, उपस्थित होते.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस.ए.गायकवाड यांनी काम पाहिले.

COMMENTS