Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ

संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पाणी नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चिंचोली गुरव येथील जाते खाणी बंधारा ते शिवाचा मळा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, सरपंच विलास सोनवणे, विलास मास्तर सोनवणे,संदेश गोडगे, विजय गोडगे, डॉ.सुहास आभाळे आदींसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.  निळवंडे डाव्या कालव्यातून चिंचोली गुरव मध्ये कारखान्याच्या माध्यमातून पाणी आले असून जाते खाणी बांधारा ते शिवाचा मळा या दोन किलोमीटर लांबीच्या अंतरावर सिमेंट पाईप टाकण्यात येणार आहे.  यावेळी बोलताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. मात्र पाणी वाटपाच्या वेळेस दुर्दैवाने ते नाही तरीही सर्व भागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांना सिमेंट नळ्या दिल्या आहेत त्यामुळे नालाबर्डी बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. सध्याचे सत्ताधारी ज्यांना हा परिसर माहिती नाही ज्यांना शेतकऱ्यांचे काही देणे – घेणे नाही ते फक्त फोटोसाठी येत आहेत. काम आपल्यालाच करायचे आहे. शेतकरी राजा हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यात पाठीशी आहे.  या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात हेच पाणी देणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कारखाना सातत्याने मदत करेल असे ते म्हणाले. संपतराव गोडगे म्हणाले की, थोरात कारखान्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये विविध गावांना पाणी देण्याचे काम केले आहे. देवकवठे येथेही कारखान्याने सिमेंट पाईप देऊन पाणी पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांसह मोठी मदत केली आहे. चिंचोली गावच्या काही भागाला यामुळे पाणी मिळाले आहे सर्व भागाला पाणी देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सोनवणे यांनी तर विजय गोडगे यांनी आभार मानले.

बलुतेदार संस्था अध्यक्षपदी दिगंबर नाईकनवरे तर उपाध्यक्षपदी बबन पवार
‘निळवंडे’च्या लाभक्षेत्रातील सर्वांना पाणी देणे हेच उद्दिष्ट; माजी मंत्री थोरात; संगमनेरात ‘युवा संगम’ कार्यक्रम उत्साहात  
भूमिपूजनासाठी कोल्हेंकडून दमबाजी : कदम

संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पाणी नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चिंचोली गुरव येथील जाते खाणी बंधारा ते शिवाचा मळा येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सिमेंट पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, सरपंच विलास सोनवणे, विलास मास्तर सोनवणे,संदेश गोडगे, विजय गोडगे, डॉ.सुहास आभाळे आदींसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.

 निळवंडे डाव्या कालव्यातून चिंचोली गुरव मध्ये कारखान्याच्या माध्यमातून पाणी आले असून जाते खाणी बांधारा ते शिवाचा मळा या दोन किलोमीटर लांबीच्या अंतरावर सिमेंट पाईप टाकण्यात येणार आहे.

 यावेळी बोलताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी धरण व कालवे पूर्ण केले. मात्र पाणी वाटपाच्या वेळेस दुर्दैवाने ते नाही तरीही सर्व भागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कारखान्याच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांना सिमेंट नळ्या दिल्या आहेत त्यामुळे नालाबर्डी बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. सध्याचे सत्ताधारी ज्यांना हा परिसर माहिती नाही ज्यांना शेतकऱ्यांचे काही देणे – घेणे नाही ते फक्त फोटोसाठी येत आहेत. काम आपल्यालाच करायचे आहे. शेतकरी राजा हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यात पाठीशी आहे.  या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात हेच पाणी देणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कारखाना सातत्याने मदत करेल असे ते म्हणाले.

संपतराव गोडगे म्हणाले की, थोरात कारखान्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये विविध गावांना पाणी देण्याचे काम केले आहे. देवकवठे येथेही कारखान्याने सिमेंट पाईप देऊन पाणी पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांसह मोठी मदत केली आहे. चिंचोली गावच्या काही भागाला यामुळे पाणी मिळाले आहे सर्व भागाला पाणी देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातूनच प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सोनवणे यांनी तर विजय गोडगे यांनी आभार मानले.

COMMENTS