अहिल्यानगर: शहरातील तपोवन रोड परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. इंडो आयरिश रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘बिंगो’ नावाचा हार-जितीचा खेळ खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे १ लाख ९६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आकाश राजेंद्र काळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सूर्यभान तागड हा मुख्य आरोपी ओंकार ठोंबरे याच्या सांगण्यावरून हा जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संतोष तागडसह संतोष फणसे, राहुल फणसे, पुष्कर पाषाण आणि कांचा उर्फ महावीर कोंडेकर हे जागीच जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी संगणक संच, इंटरनेट मोडेम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ओंकार ठोंबरे आणि विशाल नावाचा इसम सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी एका विशिष्ट वेबसाईटचा आयडी आणि पासवर्ड वापरून हा अवैध धंदा चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार बाळासाहेब गिरी करत आहेत. शहरात अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

COMMENTS