शेवगाव : तालुक्यातील प्रभूवाडगाव ते दहिगाव शे. या दोन गावांना जोडणाऱ्या जुन्या पानंद रस्त्याचे तातडीने मुरमीकरण व खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी

शेवगाव : तालुक्यातील प्रभूवाडगाव ते दहिगाव शे. या दोन गावांना जोडणाऱ्या जुन्या पानंद रस्त्याचे तातडीने मुरमीकरण व खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभूवाडगाव येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार संजय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रभूवाडगाव ते दहिगाव शे. दरम्यानचा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पानंद रस्ता अनेक वर्षांपासून शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरात आहे. महसूल नकाशावर अस्तित्वात असलेला हा रस्ता शेतजमिनीमधून जात असून सध्या कच्च्या स्वरूपात आहे. या रस्त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेती मशागत, पेरणी, कापणी, शेतमाल वाहतूक तसेच जनावरांच्या चाऱ्याची ने-आण यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच दोन्ही गावांमधील दळणवळणासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने आणि पावसाळ्यात चिखल साचत असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा वाहनांची वाहतूकही ठप्प होत असून शेतमाल व इतर आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून मुरमीकरण व खडीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई अंगरखे, अल्का बटूळे, मनिषा दराडे, अरुणा बटूळे, कासुबाई दराडे, मथुरा केदार, अनिता केदार, उषा अंगरखे, शोभा खेडकर, आशा जायभाये, कासुबाई खेडकर, भगवान खेडकर, वासुदेव बटूळे, देविदास दराडे, अशोक दराडे, भगवान बटूळे, राजु अंगरखे, भागवत बटूळे, भागवत बारगजे, शहादेव बटूळे, शरद दराडे, बाळासाहेब बारगजे आदींच्या स्वाक्षऱ्या असून हे सर्वजण यावेळी उपस्थित होते.

COMMENTS