अहिल्यानगर : दीड महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर रविवार (दि. १५ जून २०२६) पासून राज्यातील शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. याच निमित्ताने कौडग

अहिल्यानगर : दीड महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर रविवार (दि. १५ जून २०२६) पासून राज्यातील शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. याच निमित्ताने कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी बोलताना युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी, जिल्हा परिषद शाळा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य कणा असल्याचे सांगत पालकांनी मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी नवागतांना शुभेच्छा देत गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन सत्कार केला.
याप्रसंगी तलाठी इरफान शेख यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले, तर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्वांसाठी गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला युवासेना जिल्हा उपप्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य सोमनाथ कांडके, ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब धीवर, माजी सरपंच वसंतराव खर्से, तलाठी इरफान शेख, जि.प. शाळेचे शिक्षक लहू फलके, रवींद्र इंगुले, सुजाता बोरुडे, मीरा पोटे, अनुराधा ढाकणे यांच्यासह मनोज शेख, निखिल खोमणे, मनोज कदम, संजय खोमणे, बापू कर्पे, युवराज खर्से व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS