Homeताज्या बातम्याक्रीडा

दुसऱ्या कसोटीत भारताचा शानदार विजय

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आ

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. जसप्रीत बुमराह यशस्वी जैस्वाल शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहने 9 विकेट घेतल्या.

या सामन्यात 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 292 धावांवरच संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने 73 धावांचे योगदान दिले, यात 8 चौकार आणि 1 षटकार होता. याशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, त्यामुळे त्यांचा 106 धावांनी पराभव झाला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. यात यशस्वी जैस्वालने 209 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, त्यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मात्र, याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंड केवळ 253 धावांत गारद झाला. भारताकडे 143 धावांची आघाडी होती. यानंतर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा फलकावर लावल्या. इंग्लिश संघाला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले. बुमराह, अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना हे लक्ष गाठता आले नाही. सामना चौथ्या दिवशीच संपला.

बुमराह, अश्विनची भेदक गोलंदाजी – 399 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुबळा दिसत होता. डावाची सुरुवात चांगली झाली होती. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. यानंतर जॅक क्रॉली आणि रेहान अहमद यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 21.5 षटकांत 95 धावांत 2 विकेट गमावल्या. संघाला पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याने 6 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. याशिवाय दुसरा धक्का रेहान अहमदच्या रूपाने बसला, ज्याने 5 चौकारांसह 23 धावा केल्या.

COMMENTS