बीड : बीड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बीड नगरपालिका प्रशासन व स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम


बीड : बीड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बीड नगरपालिका प्रशासन व स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्या पुढाकाराने शहरातील बंद पडलेली शववाहिका दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
शहरात आपत्कालीन व दुःखद प्रसंगी शववाहिकेची अत्यंत गरज भासते. मात्र, मागील काही काळापासून तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा बंद होती. परिणामी नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, ज्यामुळे आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकार्यांना शववाहिका तातडीने दुरुस्त करून सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर नगरपालिका प्रशासनानेही या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत दुरुस्तीचे काम वेगाने सुरू केले आहे. यावेळी बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार विजय सिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक तसेच नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब भाई हे सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. या कामात नगरसेवक शेख माज्जेद, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव तसेच कर्मचारी पप्पू साळवे व जावेद खान यांची उपस्थिती होती. लवकरच ही शववाहिका अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होऊन बीड शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सभापती निजाम शेख यांनी सांगितले की, बीड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. शववाहिका सेवा तातडीने सुरू करणे हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे. शहरातील आरोग्य व आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा करणारा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

COMMENTS