Homeताज्या बातम्या

महावितरण अधिकार्‍यावर खंडणी मागितल्याचा आरोप; कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा इशारा

नांदेड : महावितरणच्या शहरी विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एन. कांबळे यांच्यावर खंडणीची मागणी करून जुलै महिन्याचा पगार रोखल्याचा गंभीर आ

बीड एलसीबीची धडक कारवाई; मोटारसायकल चोर जेरबंद, 5 दुचाकी जप्त, 4 गुन्ह्यांची उकल
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
दिंडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद; १.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Worker dies of electric shock while working on electric poll in Nanded |  Nanded : विजेच्या धक्क्याने वीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; मृतदेह बराच वेळ  खांबावर लोंबकळत

नांदेड : महावितरणच्या शहरी विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एन. कांबळे यांच्यावर खंडणीची मागणी करून जुलै महिन्याचा पगार रोखल्याचा गंभीर आरोप करत कर्मचारी राहुल हरिभाऊ खांडेकर यांनी आत्मदहन अथवा विषप्राशन करण्याचा इशारा देणारे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणामुळे महावितरण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुल खांडेकर हे ओटी क्रमांक जढ छज/एए/णठऊछ/कठ/00704, दि. 2 फेब्रुवारी 2026 नुसार वाजेगाव, चौफाळा, देगलूर नाका (चौक) या शाखांमध्ये कनिष्ठ कार्यालय सहाय्यक म्हणून कार्यरत असून, बी अँड आर विभागाशी संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी चारही शाखांमधील कामे प्रामाणिकपणे पार पाडूनही जुलै 2026 चा पगार देण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवेदनानुसार, 6 जुलै 2026 रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एन. कांबळे यांनी कार्यालयात बोलावून या महिन्याचा पगार काढणार नाही, तुला अनुपस्थित दाखवतो, अशी धमकी दिली. याबाबत कारण विचारले असता माझी मर्जी, मी काहीही करेन, असे उत्तर देत उपस्थिती मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप खांडेकर यांनी केला आहे. या कथित प्रकारामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून, जुलै महिन्याचा पगार तात्काळ अदा करून संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता, महावितरण शहरी विभाग यांना दिलेल्या निवेदनात, निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास कार्यालयातच आत्मदहन किंवा विषप्राशन करून जीवन संपविण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संघटना, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तसेच विविध सामाजिक संघटनांना पाठविण्यात आल्या आहेत.

COMMENTS