Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर; लिंबागणेश येथे रास्ता रोको

लिंबागणेश : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढता

निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; पुजा देवळेकर यांना ‘समाजभूषण’ सन्मान
केज नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले! युवा नेते रणजित आडसकर यांच्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलणार?
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा

लिंबागणेश : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि. 16 मार्चपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला दहा दिवस पूर्ण झाले आहेत.
उपोषणादरम्यान त्यांच्या सासर्‍यांनी, रामराव होळकर यांनी जालना येथे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने धनगर समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला सरकारच्या दिरंगाई व दुर्लक्षपूर्ण भूमिकेलाच जबाबदार धरत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रिय व संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ आज दि. 26 रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन पार पडले. आंदोलनाची सुरुवात स्व. रामराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा बळी गेला, अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनात डॉ. गणेश ढवळे, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे पाटील, बाळासाहेब मुळे, शहादेव धलपे, कृष्णा पितळे आदींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी गणेश ढगारे यांनीही आपले विचार मांडले. वक्त्यांनी शासनाने न्यायालयीन प्रक्रिया व समित्यांच्या विलंबात न अडकता ‘धनगर’ व ‘धनगड’ हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा, तसेच राज्यपालांच्या शिफारशीसह प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, विठ्ठल राठोड, गणेश परझने (सहाय्यक फौजदार), मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सरपंच बाळासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, शंकर वाणी, भगवान मोरे, गणपत तागड, बंकट लगास, रामदास मुळे, गोवर्धन गिरे, रोहित तागड, प्रविण मुळे, अर्जुन गिरे, रामकिसन गिरे, सुमंत मुळे, संदीप मुळे, बाबासाहेब गिरे, केशव गिरे, श्रीराम तागड, सुरेश निर्मळ, तुकाराम गायकवाड, गोरख मुळे, संजय पावले, रमेश गायकवाड, बंडू ढगारे, अमोल पितळे, हनुमंत वैद्य आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. एकूणच, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS