Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंमळनेर पोलीसांची धडाकेबाज कारवाई; कोयता गँगवर ताबा

बीड : बीड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन अंमळनेरने धडाकेबाज कारवाई केली आहे. मा. पोलीस अध

रंगभूमी : समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम; जागतिक रंगभूमी दिन – 27 मार्चमराठी नाटकांची परंपरा, प्रवास आणि वर्तमानाचा सखोल वेध
गेवराईच्या सांस्कृतिक परंपरेला आर्ट ऑफ फन अकॅडमीने नवसंजीवनी दिली- गीताभाभी बाळराजे दादा पवार; आर्ट ऑफ फन अकॅडमीचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
बीडमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा

बीड : बीड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन अंमळनेरने धडाकेबाज कारवाई केली आहे. मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष आदेश दिलेले होते. दिनांक 24 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता, पोलीस स्टेशन अंमळनेरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भार्गव सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पेट्रोलिंग करत होते. यावेळी भाटेवाडी शिवारातील गारमाथा येथे, हॉटेल तुळजाई समोर अहिल्यानगर ते बीड जाणार्‍या रोडवर, पाच युवक हातात धारदार शस्त्र घेऊन गोंधळ करताना आढळले.
देविदास ऊर्फ देवा घनशाम पव्हणे, वय 27, रा. उंबरविहीरा, ता. पाटोदा, जि. बीड (ह.मु. काळे पडळ, हडपसर, पुणे) , सुरज रमेश जाधव, वय 24, रा. लक्ष्मीनगर, ता. भुम, जि. धाराशिव (ह.मु. पापडेवस्ती, हडपसर, पुणे), अविनाश सिद्धाराम कोळी, वय 27, रा. विजापुर नाका, सोलापुर (ह.मु. पापडेवस्ती, हडपसर, पुणे), राहुल मलाप्पा मेहेत्रे, वय 26, रा. दत्तनगर, निलंगा, जि. लातुर (ह.मु. फुरसुंगी, हडपसर, पुणे), विवेक विनोद राम, वय 18, रा. देवराईनगर, हडपसर, पुणे दोन्ही पंचासमक्ष झडती घेतली असता, देविदास ऊर्फ देवा पव्हणे यांच्या ताब्यात स्टीलचा धारदार पाटेचा सुरा आणि सुरज जाधव यांच्या ताब्यात धारदार लोखंडी कोयता आढळले. सदर आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन अंमळनेर येथे गुन्हा क्रमांक 44/2026, कलम 4, 25 शस्त्र अधिनियम 1959 सह कलम 3(5) इछड अंतर्गत 25 मार्च 2026 रोजी रात्री 12.47 वाजता नोंदवला गेला. सदर आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडसह 25 मार्च 2026 रोजी प्रथमवर्ग न्यायालय, पाटोदा येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 मार्च 2026 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. पोलीसांनी सांगितले की, आरोपी पुणे शहरात राहतात आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यातील कोयता गँगशी संबंध आहेत की नाही, तसेच शस्त्र कुठून मिळाले आणि इतर साथीदार आहेत का, याची तपासणी पोलीस कस्टडी दरम्यान सुरू आहे. पोलीस स्टेशन अंमळनेरने नागरिकांना आवाहन केले आहे की, परीसरात अशा प्रकारचे अवैध शस्त्र बाळगणारे दिसल्यास घाबरून न जाता तातडीने पोलीसांशी संपर्क साधावा, जेणेकरून अशा गुन्हेगारांवर वेळेत कारवाई करता येईल. सदर कारवाईमुळे पोलीस अधिकार्‍यांच्या सततच्या प्रयत्नांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या धोरणाला बळकटी मिळाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्रांतीची भावना निर्माण झाली आहे.

COMMENTS