Homeताज्या बातम्या

ढवळपुरी आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सहलीसाठी निवड; डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान परीक्षेत मोठे यश

भाळवणी : डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान स्पर्धा परीक्षेत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश सं

कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक २३ जूनला सर्वपक्षीय, शेतकरी संघटनेचे आंदोलन ;  मुख्यमंत्र्यांना निवेदन
पारनेरमध्ये अवकाळीचा तडाखा; वादळी पाऊस अन् गारपिटीने टोमॅटो, आंबा बागा उद्ध्वस्त
रांजणगाव रोड येथे कुस्ती आखाड्याच्या कामास प्रारंभ; पैलवानांसाठी आधुनिक सुविधेची निर्मिती

भाळवणी : डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान स्पर्धा परीक्षेत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळविलेल्या अश्विन संजय गिरवाल आणि मनस्वी सचिन चौधरी या दोन विद्यार्थ्यांची ‘इस्रो’च्या (ISRO) श्रीहरिकोटा येथील अवकाश संशोधन केंद्राच्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.

या परीक्षेला प्राथमिक आश्रमशाळेतील इयत्ता सहावीचे १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी अश्विन संजय गिरवाल याने पारनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर मनस्वी सचिन चौधरी हिने चौथा क्रमांक मिळविला. याशिवाय आराध्या कपाटे, कृष्णा बिडे, गौरी बुचुडे, स्वरांजली बुळे, आर्यन चितळकर, कुणाल चितळकर, स्नेहा चितळकर, श्रेया डोळझाके, सुयश पाचारणे, माही शेख, कार्तिक थोरात, सत्यजित थोरात, साई वाबळे, अन्वीता वाघ, आरव वाघ आणि गायत्री वाघ हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना राजाराम वाघ, संतोष पट्टेकर, लतिफ राजे, प्रशांत पादीर, समाधान भुसारे आणि भावना बेरड यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या सुवर्ण यशाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे, संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, विश्वस्त आस्मा काझी, सहायक लेखाधिकारी संजय शेलार, निरीक्षक तुकाराम कातकडे, निरीक्षक विनोदकुमार लाड, सरपंच नंदा गावडे, उपसरपंच बबन पवार यांच्यासह ढवळपुरी व भाळवणी परिसरातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS