Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः शेवगाव मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत झालेल्या दंगली प्रकरणी शेवगावकरांशी संवाद साध

म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड
खोटे बोलणे आपली संस्कृती नाही: आमदार रोहित पवार
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंधसाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना

भातकुडगाव फाटा प्रतिनिधी ः शेवगाव मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत झालेल्या दंगली प्रकरणी शेवगावकरांशी संवाद साधण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेवगाव येथील व्यापारी व कार्यकर्त्याच्या भेटी घेऊन परिस्थितीची महिती घेतली या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह राज्यातुन आनेक नेते मंडळी हजर होते.
या कार्यक्रमानंतर अहमदनगर जिल्हा संपर्क रावसाहेब खेवरे यांच्यासह काही निवडक नेते मंडळींनी भायगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड लक्ष्मणराव लांडे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी लांडे कुटुंबाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती शेती व शेतकर्‍यासमोरील अवकाळी पावसाने उभे केलेले संकट या व इतर विषयावर साधक बादक चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा उपप्रमुख रामदासजी गोल्हार, नेवासा तालुका प्रमुख हरिभाऊ शेळके, शिवम म्हसे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, भागिनाथ शिरसाट, यांच्यासह लांडे कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

COMMENTS