Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायत मधील लाभार्थ्यांना 50 लाखांच्या हप्त्यांचे वितरण

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 69 लाभार्थ्यांना 49 लाख 60 हजार रुपयांचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वितरित

मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका
अशांतता निर्माण करणारे गुन्हेगार व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करा 
अक्षदा मंगल कलशाचे राजूरमध्ये स्वागत

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 69 लाभार्थ्यांना 49 लाख 60 हजार रुपयांचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी अजय साळवे, गटनेते, उपगटनेते, सभापती, नगरसेविका, नगरसेवक तसेच विरोधी पक्ष गटनेते, लाभार्थी तसेच सर्व नगरपंचायतचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
 कोरोना काळापासून अनेक दिवस पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत हप्ते हे मागे पुढे झाले होते. परंतु आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासन व संबंधित विभागाला पाठपुरावा करून व नगरपंचायतच्या सर्व पदाधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून तात्काळ हप्ते वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हप्ते जमा झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. लवकरच उर्वरित चौथा व काहींचे पेंडिंग पहिले, दुसरे, तिसरे हप्ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, बांधकाम सभापती छाया शेलार यांनी दिली. कार्यक्रमासाठी गटनेते संतोष मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई  भैलुमे, उप गटनेते सतीश पाटील, भास्कर भैलुमे, ज्योती शेळके, लंकाताई खरात, विरोधी पक्षनेत्या अश्‍विनी दळवी, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सुवर्णा सुपेकर, स्वीकृत नगरसेवक रज्जाक झारेकरी  तसेच नगरपंचायतचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांनी कामे चालू केली आहेत त्यांचेही चेक वाटप येत्या दोन- तीन दिवसात करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत पदाधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS