Homeताज्या बातम्याअहमदनगर

देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी

नवी दिल्ली ः भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) विद्यमान टर्मिनल, नवीन टर्मिनल, विद्यमान धावपट्टी, ऍप्रन, विमानतळ मार्गनिर्देशन सेवा (नेव्हिगेशन सर्व

ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे येऊ शकते तिसरी लाट
विकास आघाडीतर्फे 11 कोटी निधीला विरोध करणार्‍या नगरसेवकांच्या दारात ढोल-ताशांचा गजर
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी

नवी दिल्ली ः भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) विद्यमान टर्मिनल, नवीन टर्मिनल, विद्यमान धावपट्टी, ऍप्रन, विमानतळ मार्गनिर्देशन सेवा (नेव्हिगेशन सर्व्हिसेस, एएनएस), नियंत्रण कक्ष, तांत्रिक ब्लॉक यांच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी पुढील पाच वर्षांत सुमारे 25 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. याव्यतिरिक्त, पीपीपी अंतर्गत देशभरातील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांच्या विकासासाठी 36 हजार कोटी रुपये गुंतवणुकीची योजना आखण्यात आली आहे.
भारत सरकारने देशभरात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी ’तत्त्वतः’ मान्यता दिली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील शिर्डी, पश्‍चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पाकयोंग, केरळमधील कन्नूर, आंध्र प्रदेशातील ओरवाकल, कर्नाटकातील कलबुर्गी, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर ही आठ ग्रीनफिल्ड विमानतळे कार्यान्वित झाली आहेत. घरगुती देखभाल, दुरुस्ती (एमआरओ) सेवांसाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर 18 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी केला आहे. विमान भाड्याने देणे आणि वित्तपुरवठा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले गेले आहे.

COMMENTS