Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा-म्हसवड-माळशिरस चौक रस्ता दुरुस्तीची मागणी

म्हसवड / वार्ताहर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा ते म्हसवड रस्ता माळशिरस चौकापर्यंत दुरुस्त करणे विषयी आदेश होण्याबाबतचे निवेदन भाजपा ओ

माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराड पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार
शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत
राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा सक्षम करणार : ना. शंभूराज देसाई

म्हसवड / वार्ताहर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा ते म्हसवड रस्ता माळशिरस चौकापर्यंत दुरुस्त करणे विषयी आदेश होण्याबाबतचे निवेदन भाजपा ओबीसी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष करण पोरे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिलेल्या या निवेदनात भाजपा ओबीसी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य करण पोरे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 सी खास करून सातारा ते म्हसवड, माळशिरस चौकचे 98% काम पूर्ण होऊन दोन – तीन वर्षे उलटून गेली आहेत. परंतू काही ठिकाणी रस्त्याची अवस्था निंदनीय आहे. वास्तविक काम सुरू झाल्यापासून दिड दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते तसे झाले नाही. अनेक ठिकाणी पूल व मोरी यावरील बांधकामे अपूर्ण आहेत. सबब वहातुकीस अडचणीचे व अपघातात निमंत्रण देणारे आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्ता उकरून ठेवला आहे. पण त्याचे काम चालू केले नसल्याने सदरचा रस्ता वापरण्या योग्य नसला तरी नाईलाजाने दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना त्याचा वापरावा लागत आहे.
या उर्वरित कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यायी रस्ते जरी उपलब्ध करून दिले असले तरी सदरचे पर्यायी रस्ते वाहन चालवण्या योग्य नाहीत. पर्यायाने आपले पक्षास लोकांचे टिकेस सामोरे जावे लागत आहे. 2% राहिलेले काम पूर्ण झालेल्या 98% कामावर पाणी फिरवत आहे. अशामुळे नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी नागरिकांच्या मागणीनुसार विनंती करतो कि सदरचे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी व जरी काही अपवादात्मक परिस्तिथीमुळे काही ठिकाणचे काम चालू करता येत नसले तरी प्रलंबीत रस्ते वहातूकीस योग्य राहतील. याची काळजी घेण्यात यावी याबाबत सक्त ताकीद देण्यात यावी. त्या ठिकाणी वाहन चालवण्या योग्य पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यास संबंधित कार्यरत यंत्रणेस उचित आदेश होणेबाबत करण पोरे यांनी विनंती केली आहे.

COMMENTS