Homeताज्या बातम्या

तामसा परिसरात गुटखा विक्रीचा सुळसुळाट; बंदी केवळ कागदावर? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

तामसा: राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही हदगाव तालुक्यातील तामसा आणि परिसरात गुटख्याचा अवैध व्यापार राजरोसपणे सुरू असल्या

ज्या शाळेने घडविले, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याचा पुढाकार; १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग वाटप
तिरंगा मोर्चात संयम बाळगण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन; गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
Police fda acted against eight in dombivli east for stocking and selling  banned gutkha | डोंबिवली स्टार काॅलनीत प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या  नऊ पान टपरी चालकांवर गुन्हे ...

तामसा: राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही हदगाव तालुक्यातील तामसा आणि परिसरात गुटख्याचा अवैध व्यापार राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे. बंदी असलेला गुटखा खुलेआम आणि चढ्या दराने विकला जात असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर गुटखा माफियांविरोधात धडक कारवाया करून मोठी दहशत निर्माण केली होती. मात्र तामसा परिसरातील सद्यस्थिती पाहता त्या कारवायांचा प्रभाव ओसरला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बंदी असतानाही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांवर प्रभावी अंकुश बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र हदगाव-तामसा परिसरात सुरू असलेली गुटखा विक्री पाहता अद्यापही अवैध व्यवसायांवर अपेक्षित वचक निर्माण झालेला नसल्याची चर्चा सुरू आहे.

बंदीमुळे गुटख्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून ग्राहकांकडून जादा किंमत वसूल केली जात आहे. त्यामुळे काही साठेबाज आणि विक्रेते या अवैध व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळवत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे गुटख्याचे व्यसन पालकांसह सामाजिक संघटनांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता या प्रकारावर तातडीने लगाम घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

नागरिकांनी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवून गुटखा साठेबाज, पुरवठादार आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा “गुटखा जोमात… आणि यंत्रणा कोमात!” अशीच परिस्थिती कायम राहण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS