Homeताज्या बातम्या

राज्यात पुढील २४ तास मुसळधार पावसाचे! पुणे, सातारा घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’; धुळ्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी

मुंबई/पुणे/धुळे: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. पूर्व विदर्भातील कमी द

सौ. के.एस.के. महाविद्यालयात विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न
कड्यात संविधान प्रेमी व सामाजिक संघटनेच्या वतीने शांततापूर्ण निषेध रॅली! केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
संत ज्ञानेश्वर माऊली दादांचे नाव घेतल्याने पुण्यवंत होता येते; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन
Maharashtra Rain : IMD चा मोठा इशारा! महाराष्ट्रात पुढील 24 तास अतिमुसळधार  पावसाची शक्यता | Maharashtra Rain Alert Mumbai Thane Vidharbha Weather  Update By Imd | Asianet News Marathi

मुंबई/पुणे/धुळे: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. पूर्व विदर्भातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे त्याचा प्रभाव अद्याप कायम असून, पुढील २४ तासांमध्ये राज्यात अशीच पावसाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

घाटमाथ्यावर रेड अलर्ट; रविवारीनंतर जोर ओसरणार

पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर पुणे शहरासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांनंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याचा अंदाज असून, खासकरून रविवारनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धुळे जिल्ह्यात मुसळधार; धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

धुळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील सखल भाग जलमय झाले आहेत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सततच्या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातून ४,९२१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, अक्कलपाडा धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी आणि पांझरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS