रयतच्या संचालक मंडळाकडून सोनहिरा कारखान्याप्रमाणे ऊसदर : ना. विश्‍वजित कदम

Homeमहाराष्ट्र

रयतच्या संचालक मंडळाकडून सोनहिरा कारखान्याप्रमाणे ऊसदर : ना. विश्‍वजित कदम

यशवंतराव मोहिते भाऊंनी कृष्णा कारखाना उभारणीमध्ये प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यांचे या विभागाच्या विकासातील योगदान सर्वांना ज्ञात आहे.

तुम्हाला कायदा राबवण्यासाठी निवडून दिले तो राबवा ,आरत्या काय करत बसलात
जामखेडमधील तांडा-वस्त्या होणार प्रकाशमान
हिला आज खपवून टाक, हिचं खूप झालं आहे…घोडकेवाडीत विवाहितेच्या खुनाचा पती व नणंदेकडून प्रयत्न

इस्लामपूर / प्रतिनिधी : यशवंतराव मोहिते भाऊंनी कृष्णा कारखाना उभारणीमध्ये प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यांचे या विभागाच्या विकासातील योगदान सर्वांना ज्ञात आहे. कृष्णेवर सहकाराची पंढरी ही भाऊंच्या विचाराची होती. परंतू गेल्या दहा वर्षात सत्तेवर बसलेल्या मंडळींनी भाऊंच्या विचारांना सोडून दिले. सभासदांना सापत्न वागणूक दिली. त्याच मंडळींकडून सद्या दबावाचे राजकारण चालू आहे. परंतू कोणीही या दबावाला न घाबरता निवडणुकीला सामोरे जावे. विश्‍वजित कदम तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. रयत पॅनेल निवडून आल्यानंतर नवे संचालक मंडळ सोनहिरा कारखान्याप्रमाणे ऊसदर देण्यास कुठेही आम्ही कमी पडणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्‍वजित कदम यांनी केले.

नरसिंहपूर, बहे, हुबालवाडी (ता. वाळवा) येथील सभासदांच्या बैठकांमध्ये ते बोलत होते. युवा नेते जितेश कदम, राजेंद्र शिंदे, आर. आर. पाटील, उमेदवार विश्‍वासराव मोरे, विवेकानंद मोरे, संजय पाटील, सत्वशिला थोरात, गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. कदम म्हणाले, ही निवडणूक सभासदांचे न्याय्य व हक्क मिळवून देणारी लढाई आहे. कृष्णेच्या सभासदांना जास्तीत जास्त दर देवून त्यांचा विकास साधण्याचे रयत पॅनेलचे धोरण आहे. सोनहिरा साखर कारखान्याप्रमाणे कृष्णेच्या सभासदांना दर मिळावा. हीच माझी इच्छा आहे. त्याकरिता कारखान्यावर रयत पॅनेलची सत्ता आली पाहिजे. 

ते म्हणाले, जात व धर्म यावर भाऊंचा विचार नव्हता. परंतु गेल्या दहा वर्षात सत्ताधार्‍यांनी केवळ स्वतःचा आर्थिक विकास साधण्याचे काम केले. सभासद हित नजरेआड केले. अशा मंडळींना सत्तेवरून घालवण्यासाठी भाऊंचा विचार कारखान्यात पुन्हा आणायचा आहे. पाच वर्षे इंद्रजित बाबांनी चांगले कामकाज करून सभासदांना जास्तीत जास्त दर दिला. सभासद व शेतकरी हे मालक मानून त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी जपली. त्यांच्या विचारांचे सभासद हित जोपासणारे संचालक मंडळ निवडून देणे महत्वाचे आहे. असे सांगून या विभागात निवडणुका आल्या की, दबावाचे राजकारण केले जाते. पण घाबरु नका, अन्यायाला न्याय देण्याची आमची भूमिका राहील. हा विश्‍वजित कदम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. 

कृष्णेचे माजी संचालक जयवंतराव सावंत यांनी स्वागत केले. दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले.

COMMENTS