Homeताज्या बातम्या

त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण

24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
देवाभाऊंचे शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा
अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवार्‍यासह पावसाने उद्ध्वस्त !पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले !तातडीने नुकसानभरपाईची मागणी-डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाला सरपंच बाळासाहेब जाधव, भीम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अ‍ॅड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरी पाटील, संजय पावले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भीम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “वंचितांच्या हक्कासाठी लढणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाईंचा त्याग, प्रेरणा आणि खंबीर साथ अत्यंत मोलाची होती. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेत असताना अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संसाराची धुरा सांभाळली. त्यांच्या या महान त्यागामुळेच बाबासाहेबांना समाजउद्धार व भारतीय संविधान निर्मितीचे ऐतिहासिक कार्य करता आले.” तसेच बाबासाहेबांनी आपला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथही माता रमाईंना समर्पित केल्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमात बाळासाहेब मुळे व रमेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.

COMMENTS