लोहा शहरातील अवैध व्यवसायांवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार आणि लोहा पोलिसांनी मोठी कारवाई करीत तीन लॉज

लोहा शहरातील अवैध व्यवसायांवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार आणि लोहा पोलिसांनी मोठी कारवाई करीत तीन लॉजवर छापे टाकले. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये तब्बल 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे लोहा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे 16 मे रोजी सायंकाळी लोहा शहरातील निलय लॉज येथे छापा टाकण्यात आला. या वेळी लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी लॉजमधील तीन महिलांची सुटका केली असून घटनास्थळी काहीजण मद्यपान करीत असल्याचेही आढळून आले. या प्रकरणी रामकिशन विठ्ठलराव ढगे (वय 47, व्यवसाय-लॉजिंग), गुलाब रशीद शेख, सोमनाथ गंगाधर जंगले, बालाजी दत्ता जाधव, आनंद प्रकाश श्रीमंगले, शिलानंद कमलाकर वारकरे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, लोहा शहरातील रणवीर लॉज व आर्या लॉज यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या लॉजमध्ये येणार्या ग्राहकांची नोंद न ठेवणे, ओळखपत्र न घेता खोल्या भाड्याने देणे अशा नियमभंगाच्या प्रकारांचा उलगडा झाला. याप्रकरणी रणवीर लॉजचे मालक बालाजी सदाशिव जाधव व मॅनेजर रफिक अमीर शेख तसेच आर्या लॉजचे मालक अजय मारोती भिसे व मॅनेजर माधव गणेश कंधारे यांच्याविरुद्ध स्वतंत्र दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान देशी व विदेशी दारूसह सुमारे 3 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी कौतुक केले.

COMMENTS