Homeताज्या बातम्याअहमदनगर

स्थानिक गुन्हे शाखेचा अवैध धंद्यांवर छापासहा जणांवर गुन्हे दाखल

अहिल्यानगर: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच अवैध दारू विक्रेते आणि एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली असून एकूण ३७,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांनी श्रीगोंदा, पारनेर आणि अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. श्रीगोंदा परिसरात दोन ठिकाणी गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर तर एका ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पारनेरमध्ये एका दारू विक्रेत्याला पकडण्यात आले, तर अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या कारवाया करून २४,४०० रुपयांचा माल हस्तगत केला.या प्रकरणी पोलिसांनी संबंधित सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये कोठेही असे अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष किंवा स्थानिक गुन्हे शाखेच्या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केले आहे. गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सायखिंडी फाटा परिसरातील 100 युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पत्रकार संरक्षण समितीचा क्रांतिदिनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा
Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

COMMENTS