नवी मुंबईतील हवा गुणवत्ता श्वास कोंडवणारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईतील हवा गुणवत्ता श्वास कोंडवणारी

निर्देशांक 300 पार गेल्याने नागरिकांचे जीव धोक्यात

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आलं आहे.नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खू

कोपरगाव शहरात वाढले चोर्‍याचे प्रमाण
राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान : ॲड. यशोमती ठाकूर
दस्तनोंदणी करता न आलेल्यांना सरसकट एक हजार रुपये दंड

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आलं आहे.नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून,रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही,अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती व्यक्त होत असून आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याला गंभीरपणे घेत नसल्याचे दिसून येत आहे.मात्र यावर स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही.त्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाल्याचे चित्र आहे.नवी मुंबईतील अनेक ठिकाणी एमआयडीसी आहे. त्यामुळे कंपन्या रात्रीच्या अंधारात घातक धूर सोडतात आणि त्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मरणयातना सहन करून जगावे लागत आहे.वेळीच यावर उपाययोजना न केल्यास याचे परिणाम भयंकर होणार असल्याचे दिसून येत आहे.भयंकर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली नवी मुंबईची ही रात्रीची दृश्य आहेत.

COMMENTS