Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष एकमार्गी रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष एकमार्गी रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 1.

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरण
केकेआरच्या दिल्लीवरील विजयाने आव्हान कायम    
भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन



प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष एकमार्गी रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 1.3 पट भाडेदराने चालविण्यात येणार असून खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध राहील.
1) गाडी क्रमांक 07812 तिरुपती-नांदेड विशेष गाडी : ही विशेष गाडी दि. 19 मे (मंगळवार) रोजी तिरुपती येथून रात्री 21:10 वाजता सुटून रेणीगुंटा, कडप्पा, गुंतकल, रायचूर, सिकंदराबाद, निजामाबाद, बासर, मुदखेड मार्गे 20 मे रोजी दुपारी 15:10 वाजता नांदेड येथे पोहोचेल. या गाडीमध्ये 22 डबे उपलब्ध असतील. 2) गाडी क्रमांक 07813 लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड विशेष गाडी : ही विशेष गाडी दि. 20 मे 2026 (बुधवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 12:00 वाजता सुटेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करून त्याच दिवशी रात्री 23:50 वाजता नांदेड येथे पोहोचेल. गाडीमध्ये 18 डबे असतील. 3) गाडी क्रमांक 07814 नांदेड-तिरुपती विशेष गाडी : ही विशेष गाडी दि. 21 मे  (गुरुवार) रोजी नांदेड येथून सायंकाळी 20:45 वाजता सुटेल. ही गाडी मुदखेड, बासर, निजामाबाद, करीमनगर, वारंगल, विजयवाडा, नेल्लोर, रेणीगुंटा मार्गे प्रवास करून 22 मे  रोजी दुपारी 12:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. या गाडीमध्ये 18 डबे असतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.

COMMENTS