Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता सहकारी पतसंस्थेने सभासदांना केले 15 टक्के लाभांश वाटप

राहाता ः सहकारी पतसंस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेने दीपावलीनिमित्त सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करून त्यांची

जिवाणू खते व माती,पाणी परीक्षण मूळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल – ना.गडाख
अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर
अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही

राहाता ः सहकारी पतसंस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेने दीपावलीनिमित्त सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करून त्यांची दिवाळी अधिक गोड केली असल्याची माहिती राहाता नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन राजेंद्र वाबळे यांनी दिली.

          सहकारी पतसंस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व मोठा नावलौकिक निर्माण केलेल्या राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेने राज्यातील पतसंस्थांना स्वच्छ पारदर्शी व आर्थिक शिस्तीच्या कारभाराचा आदर्श दिला आहे.  त्यामुळे या संस्थेचा राज्यात व पतसंस्था चळवळीत मोठा नावलौकिक निर्माण झाला आहे, तालुक्यातील सहकारी संस्थांना थकबाकी व कर्ज बुडव्यांपासून कायदेशीर संरक्षण देण्याकरिता संस्थेने पतसंस्थांचे तालुका फेडरेशन उभारणी व स्थापना केली आहे संस्थेचे चेअरमन राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने सर्व व्यवहार पारदर्शी व संरक्षित आहेत, त्यामुळे या संस्थेवर सभासद ठेवीदार व खातेदार आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत संस्थेला प्रथम प्राधान्य देतात त्यामुळे संस्थेची सहकारात तसेच पतसंस्था चळवळीत अधिक विश्‍वासार्हता वाढली आहे.  संस्थेकडे 38 कोटी 50 लाखांच्या ठेवी आहेत 32 कोटींचे कर्जवाटप करून अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावला आहे. संस्थेचा स्वच्छ पारदर्शी व आर्थिक शिस्तीने कारभार असल्याने थकीत कर्जदारांवर कारवाई कठोरपणे कारवाई केली जाते त्यात दुर्लक्ष होत नाही. मार्च 2023 नंतर सुमारे पाच कोटी रुपयांच्या ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. संस्थेची 17 कोटी 80 लाख रुपये सुरक्षित गुंतवणूक आहे, संस्थेकडे सुमारे आठ कोटीचे स्वतःचे फंड्स आहेत. सौर ऊर्जेचा वापर करण्याबरोबरच बँकेच्या वातानुकूलित कार्यालयात पूर्णतः ऑनलाइन कामकाज चालते स्पर्धेच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संस्थेच्या सभासदांना खातेदारांना ठेवीदार कर्जदार व नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सीबीएस बँकिंग एसएमएस अलर्ट इन्कम टॅक्स जीएसटी न्यायालयीन स्टॅम्पसह सर्व प्रकारच्या शासकीय भरण्याची सुविधा खरेदीखत गहाणखतासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फीज ऑनलाइन भरणा सुविधा ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आरटीजीएस व एनइएफटीची मोफत सुविधा व्यापारी वर्गासाठी शून्य रकमेने खाते उघडण्याची सुविधा संस्थेने उपलब्ध केल्या आहेत. संस्था आयएसओ सर्टिफाइड असून संस्थेला सतत लेखापरीक्षणाचा अ वर्ग प्राप्त केला असल्याचे यावेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र वाबळे यांनी सांगितले संस्थेच्या प्रगतीत व यशोशिखरा कडील वाटचालीत राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन व पाठबळ संस्थेला नेहमीच मिळते त्याचबरोबर संस्थेचे सर्व संचालक तसेच मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर गायकवाड सर्व सभासद ठेविदार व खातेदार यांचे यामध्ये अनमोल योगदान आहे.

सहकारी पतसंस्था चालवणे काट्यावरची कसरत मानली जाते परंतु सहकारी बँका व पतसंस्थांनी गैरप्रकार टाळून कायद्याच्या चौकटीत राहून संस्थेने आर्थिक शिस्त बाळगत स्वच्छ व पारदर्शी कारभार केला तर कसरत होत नाही. संचालक मंडळाने स्वयंशिस्त बाळगून नियम व कायद्याचा धाक ठेवून कारभार केला पाहिजे, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी सभासद व ठेवीदारांचे हित व आर्थिक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून जोपासले पाहिजे. आमच्या संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध लोकपयोगी उपक्रम राबविले असून तसेच राहाता शहरातील सर्व शाळेंच्या सर्व विद्यार्थ्यांचा अपघात विमा संस्थेने उतरवला आहे, त्याचा लाभही यापूर्वी काही कुटुंबियांना देता आला दुःखद प्रसंगी त्या कुटुंबांना संस्थेच्या रूपाने हातभार देणे शक्य झाले हे संस्थेच्या चांगल्या कामाचे प्रतीक आहे.
राजेंद्र वाबळे चेअरमन, राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था राहाता

COMMENTS