Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

जामखेड/प्रतिनिधी ः अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहम

अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीनगर‘
टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न
सावरकरांचा जन्मदिवस ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून होणार साजरा

जामखेड/प्रतिनिधी ः अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आयेजित कार्यक्रमात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आता अहमदनगरचे आहिल्यानगर करणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, खा. सदाशिवराव लोखंडे, आमदार प्रा. राम शिंदे  आमदार गोपीचंद पडळकर, आ सूरेश धस, आ मोनिका राजळे, आ बबनराव पाचपुते, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी आ राम हारी रूपनर, माजी आ लक्ष्मणराव ढोबळे, आदी  उपस्थित होते.यावेळी लाखोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धनगर समाजाच्या लहान सहान विविध मागण्याची पूर्तता करणारच आहे, मात्र अहमदनगरला आहिल्यादेवीनगर नाव देण्याची प्रमुख मागणी आज जयंतीनिमित्ताने सरकार पूर्ण करत आहे. नामांतराचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी एकत्रितपणे केला आहे.  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सरकार हिंदूत्वाच्या विचाराचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवरायांचे मावळे आहेत. हिंदूत्वाची मशाल पुढे नेणारे आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचा पारदर्शक राज्यकारभार सगळ्यांना मार्गदर्शक आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. न्यायप्रिय कारभार करत आपल्या राज्याचा विस्तार देशभर केला. आमचे सरकार धनगर समाजासाठी प्रत्येक वर्षी 25 हजार घर बांधणार आहे. 22 प्रकारच्या योजना धनगर समाजाच्या उन्नतीसाठी 22 प्रकारच्या योजना राबणारे आहे. धनगर समाजाच्या मुलांना सरकारच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रस्तावना करताना आमदा राम शिंदे यांनी नामांतर, आरक्षण यास समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे आभार मानतांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मूख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आहिल्यादेवीनगर नामांतराचे स्वागत केले.

आमदार पडळकरांनी खाल्ला भाव – आहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम आ राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला मात्र संपूर्ण कार्यक्रमात जनतेने आमदार गोपीचंद पडळकर यांनाच भाव दिला. सगळीकडे आ गोपीचंद पडळकर यांच्याच नावाने घोषणा देते होते. कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी भाषण करताना समाजाच्या विविध प्रश्‍नांची उकल केली. महाविकास सरकारने केलेल्या अडवणूकीचा उल्लेख करत शिंदे फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेले निर्णय जाहीर केले.

धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धनगर वाड्यांना जोडण्यासाठी आपण अर्थसंकल्पात रस्त्याची तरतूद केली आहे. 22 वेगवेगळ्या योजनाचा लाभ आपण आपल्या समाजाला उपलब्ध करुन दिला आहे. धनगर समाजासाठी 1 हजार कोटींच्या कामाची सुरूवात झाली होती. मात्र, सरकार बदलले आणि एक रुपयाही मिळाला नाही. आमचे सरकार आले नी पुन्हा सर्व मागण्यासाठी निधी दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर समाजासाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वाडी वस्तीवर राहणारा एकही धनगर बेघर राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

COMMENTS